ETV Bharat / state

मुख्यमंत्री मराठेतर की मराठा? शाह यांनी तावडेंकडून घेतला आढावा, फडणवीस समर्थकांची धाकधूक वाढली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याची घोषणा करण्यापूर्वी विनोद तावडे यांची भेट घेतली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे.

Amit Shah Meets Vinod Tawde
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Updated : 1 hours ago

मुंबई : 'काळजीवाहू' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश मान्य करायचं ठरवल्यानंतर मुख्यमंत्री भाजपाचा होणार, हे आता स्पष्ट झालं आहे. परंतु मुख्यमंत्री कोण होणार? हे कोडं अजूनही सुटलेलं नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विनोद तावडे यांना बुधवारी रात्री दिल्लीला आमंत्रित केलं. अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात मुख्यमंत्री पदावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष करून राज्यात मराठा आंदोलन पेटलेलं असताना बिगर मराठा चेहरा मुख्यमंत्री पदी विराजमान केल्यास, त्याचा भाजपाला फायदा किंवा तोटा कशा पद्धतीनं होईल, यावर या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

गुरुवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल मागं घेत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून स्पष्टपणे माघार घेतली. मुख्यमंत्री पदासाठी भाजपाला आता मैदान मोकळं करून दिलं आहे. भाजपाकडून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं असून केवळ अंतिम घोषणा बाकी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी रात्री भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना तातडीनं दिल्लीला बोलावून घेत त्यांच्यासोबत बैठक केली. विशेष म्हणजे गुरुवारी 'काळजीवाहू' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्याकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. एकीकडं राज्यात मराठा आंदोलन पेटलेलं असताना दुसरीकडं मुख्यमंत्री पदावर राज्यात बिगर मराठा नेता विराजमान केल्यास त्याचा भाजपाला फायदा किंवा तोटा होऊ शकतो का? याबाबत चर्चा झाली. यासोबतच महत्त्वाच्या खात्यांबाबत सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा : एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरला होता. परंतु भाजपा पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या हट्टाला अजिबात प्रतिसाद दिला नाही. अखेर बुधवारी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून ते बाहेर असल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शब्द आपल्यासाठी अंतिम असल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी आता मुख्यमंत्री पदासाठी भाजपाकडून जवळपास देवेंद्र फडणवीस यांचं नाव नक्की झालं आहे. त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत कशा पद्धतीनं चर्चा पुढं सरकवायची याबाबत विनोद तावडे यांच्याकडून अमित शाह यांनी माहिती घेतल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. सुधांशू त्रिवेदी खरी माहिती असल्याशिवाय आरोप करत नाहीत, विनोद तावडेंचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
  2. "भाजपाचा खेळ खल्लास, भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला", विरोधकांनी विनोद तावडेंना घेरलं, अटकेची केली मागणी
  3. "मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार"; विनोद तावडेंनी स्पष्टच सांगितलं

Last Updated : 1 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.