ETV Bharat / state

पेशाला काळिमा.. नांदेडमध्ये सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार

नांदेड बिलोली तालुक्यातील प्राथमिक विद्यालयातील सहावीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

teachers-physical-abuse-minor-students-in-nanded
नांदेडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार
author img

By

Published : Jan 20, 2020, 8:52 AM IST

Updated : Jan 20, 2020, 9:49 AM IST

नांदेड - बिलोली तालुक्यातील प्राथमिक विद्यालयातील सहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी या परिसरात संतापाची लाट उसळली आहे. यातील फरार आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी काही विद्यार्थी संघटनांनी आज शंकरनगर येथे शैक्षणिक बंदची हाक दिली आहे.

नांदेडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

या प्रकरणातील पीडितेची सरकारी दवाखान्यात शनिवारी रात्री तपासणी करण्यात आली. यावेळी सह पोलिस निरीक्षक शिंदे यांच्यासमोर आपल्यावरील आपबीती सांगताना सदर पीडिता भेदरुन गेली होती. याच अवस्थेत तिने रसूल व राजुळे या शिक्षकांनी केलेल्या अत्याचाराचे कथन केले. या संतापजनक प्रकरणाचा तपास करणारे डी. वाय. एस. पी. सिध्देश्वर धुमाळ यांनी फरार आरोपींना अटक करण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, या पथकाला यश आल्याचे दिसत नाही.

मुलीवर अत्याचार करणारे नराधम शिक्षक शेख रसूल व दयानंद राजुळे यांच्या कृत्याबाबत मुलीच्या आईने मुख्याध्यापक प्रदीप जाधव यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर या घटनेबाबत दोन नराधमांचे लेखी मत नोंदवून त्या दोघांना संस्थेचे अध्यक्ष खतगावकर यांच्या पुढे हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांना या गुन्ह्याबाबतची कल्पना देणे आवश्यक होते. मात्र, तसे न केल्याने या नराधम शिक्षकांचे मनोधैर्य वाढले, अशी या परिसरात चर्चा आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ व आरोपींच्या अटकेसाठी गोदावरी मनार कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज जानेवारी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नागसेन जिगळेकर यांनी प्राछमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय, कला वाणिज्य महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांना याबाबत निवेदन दिले आहे.

Intro:नांदेड : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार.
- शंकरनगर येथे आज शाळा,कॉलेज बंद.

नांदेड : बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील
श्री साईबाबा प्राथमिक विद्यालयातील सहावीतील
अल्पवयीन विद्यार्थिनीवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी या परिसरात संतापाची लाट उसळली आहे. यातील फरार आरोपींना त्वरित
अटक करण्याच्या मागणीसाठी काही विद्यार्थी संघटनांनी आज शंकरनगर येथे शैक्षणिक बंदची हाक दिली आहे.Body:
या प्रकरणातील अत्याचारग्रस्त मुलीची नांदेड येथील सरकारी दवाखान्यात शनिवारी रात्री तपासणी करण्यात आली.यावेळी सपोनि शिंदे यांच्यासमोर
आपल्यावरील आपबीती सांगताना सदर मुलगी भेदरुन गेली होती. याच अवस्थेत तिने रसूल व राजुळे
या शिक्षकांनी केलेल्या अत्याचाराचे कथन केले. या संतापजनक प्रकरणाचा तपास करणारे डी. वाय. एस. पी. सिध्देश्वर धुमाळ यांनी फरार आरोपींना अटक
करण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले.पण या पथकाला यश आल्याचे दिसत नाही.
मुलीवर अत्याचार करणारे नराधम शिक्षक शेख रसूल व दयानंद राजुळे यांच्या नीच कृत्याबाबत मुलीच्या आईने मुख्याध्यापक प्रदीप जाधव यांच्याकडे केल्यानंतर सदर घटनेबाबत या दोन नराधमांचे लेखी मत नोंदवून त्या दोघांना संस्थेचे अध्यक्ष खतगावकर यांच्या पुढे हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांना या गुन्ह्याबाबतची कल्पना देणे आवश्यक
होते. पण तसे न केल्याने या नराधम शिक्षकांचे मनोधैर्य वाढले, अशी या परिसरात चर्चा आहे. दरम्यान, वरील प्रकरणाच्या निषेधार्थ व आरोपींच्या
अटकेसाठी शंकरनगर येथील गोदावरी मनार कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज जानेवारी विद्यार्थी संघटनेचेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.Conclusion:

या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नागसेन जिगळेकर यांनी श्री साईबाबा प्रा. विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय व कला वाणिज्य महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांना याबाबत निवेदन दिले आहे.
Last Updated : Jan 20, 2020, 9:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.