ETV Bharat / state

ST employee death : निलंबित एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराने मृत्यू; बस स्थानकात मृतदेह ठेवून संघटनेचे धरणे आंदोलन

एसटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनात एका कर्मचाऱ्याचा तणावातून ( ST employees first death in Nanded) मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामुळे एसटी कर्मचारी ( ST employees anger after death of protestors ) संघटनेकरून संताप व्यक्त केला जात आहे. मृत दिलीप वीर यांचे मृतदेब बस स्थानकात ( Nanded bus stand ) ठेवण्यात आला आहे. पीडित कुटुंबियांना तात्काळ 50 लाखांची तात्काळ मदत कारवाई, अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेने केली आहे.

निलंबित एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराने मृत्यू

author img

By

Published : Dec 3, 2021, 5:45 PM IST

Updated : Dec 3, 2021, 7:18 PM IST

नांदेड- एसटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाचा ( ST employees first death in Nanded) जिल्ह्यात पहिला बळी गेला आहे. यामुळे संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एसटी वाहक दिलीप वीर ( ST conductor Dilip Veer death in Nanded ) यांचा मृतदेह बस स्थानकात ठेवण्यात आला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा ( Demand to police action on Anil Parab ) गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एसटी संघटनेकडून करण्यात आली आहे.

एसटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनात एका कर्मचाऱ्याचा तणावातून मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामुळे एसटी कर्मचारी ( ST employees anger after death of protestors ) संघटनेकरून संताप व्यक्त केला जात आहे. मृत दिलीप वीर यांचे मृतदेब बस स्थानकात ठेवण्यात आला आहे. पीडित कुटुंबियांना तात्काळ 50 लाखांची तात्काळ मदत कारवाई, अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेने केली आहे. मागणी मान्य होईपर्यंत दिलीप वीर यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाही, अशी भूमिका नातेवाईक आणि संघटनेकडून करण्यात आली आहे.

एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर नातेवाईक आणि संघटनेची प्रतिक्रिया

हेही वाचा-Analysis : पगारवाढ देऊनही संप मागे नाही, विलीनीकरणावर ठाम असल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन भरकटेल का?

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना दरम्यान दिलीप यांना गुरुवारी ह्रदयविकाराचा झटका आला होता. उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये सरकार विरोधात संतापाची लाट आहे.

हेही वाचा-ST Strike : खोत आणि पडळकरांच्या भूमिकेवर कोल्हापूरातील एसटी कर्मचारी नाराज; म्हणाले...

तीन दिवसांपूर्वी झाली होती निलंबनाची कारवाई-
वेतन वाढ दिल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोल मागे घ्यावे, अशी राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना विनंती करण्यात आली होती. मात्र, एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचारी संघटनेने घेतली आहे. दुसरीकडे राज्य सरकारने आदेशाचे पालन न करता गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई ( State Transport corporation suspension letters to ST Employees ) केली आहे. दिलीप वीर यांना तीन दिवसापूर्वी निलंबनाची नोटीस आली होती. त्यानंतर दिलीप वीर हे तणावात होते.

हेही वाचा-ST Workers Suspended : आत्तापर्यंत राज्यातील २ हजार ९३७ एसटी कर्मचारी निलंबित

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून वेतनवाढ-

वेतनासाठी आवश्यक निधी राज्य शासन आहे. त्यामुळे सुमारे 700 कोटींचा राज्य सरकारच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना किमान पाच ते सात हजार रुपयांची वेतनवाढ दिली आहे. नव्याने झालेली वेतनवाढ नोव्हेंबर महिन्याच्या पगारापासून देण्यात येईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. तसेच दर महिन्याच्या 10 तारखेला वेतन देण्याची हमी राज्य सरकारने घेतल्याचे मंत्री परब यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Dec 3, 2021, 7:18 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.