नागपूर - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ लोक अधिकारी मंचच्यावतीने नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथून आज (रविवारी) भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गरदर्शनात रॅली काढण्यासाठी काल (शनिवारी) ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
हेही वाचा - शशी शरूर यांच्याविरोधात त्रिवेंद्रम न्यायालयाने जारी केले अटक वॉरंट
यशवंत स्टेडियम, झांसीची राणी चौकातून हा मोर्चा निघाला. मोर्चामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनीही या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आहे. रॅलीमध्ये 500 मीटर लांबीचा तिरंगा झेंडा पाहायला मिळाला.
हेही वाचा - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द सरकारने पाळला नाही - चंद्रकांत पाटील