ETV Bharat / state

स्वारातीम विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षेचे निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर होणार

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे नियोजन यशस्वी करण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त परीक्षांचे निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वारातीम विद्यापीठ
स्वारातीम विद्यापीठ
author img

By

Published : Oct 29, 2020, 7:10 PM IST

नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे नियोजन यशस्वी करण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त परीक्षांचे निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वारातीम विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षेचे निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर होणार

नवीन तंत्रज्ञान, नवीन परीक्षा पद्धती आणि कमी वेळ या सर्वांची सांगड घालतांना एक दोन दिवसाच्या तांत्रिक अडचणी सोडल्यास बाकी परीक्षेचे नियोजन सुरळीत चालू आहे. इतर विद्यापीठाच्या तुलनेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ सरस आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उन्हाळी २०२० परीक्षेचे नियोजन करतांना सर्वप्रथम दोन टप्पे आखण्यात आले. पहिल्या टप्प्यात अंतिम सत्राच्या आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षाच्या अथवा सत्राच्या बॅकलॉग विषयांची परीक्षा ७ ते १४ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आली. दुसऱ्या टप्यात अंतिम सत्राच्या आणि वर्षाच्या परीक्षा १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात आले. नियोजनासाठी सर्वप्रथम परीक्षा मंडळ, विद्याशाखा आणि व्यवस्थापन परिषद सदस्य यांच्यासोबत बैठकी घेण्यात आल्या. यामध्ये झालेल्या निर्णयानुसार उन्हाळी २०२० परीक्षा एमसीक्यू पद्धतीने ऑनलाईन व ऑफलाईन घेण्याचे ठरले.

विद्यार्थांमध्ये ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात संभ्रम अवस्था राहू नये म्हणून त्यांच्या मॉकटेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये नेमकी परीक्षा कशी घ्यावयाची आहे याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन जी पद्धती योग्य वाटते त्याची समंतीपत्रक विद्यार्थांकडून भरून घेण्यात आले. २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. जवळपास २२ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धत निवडली तर त्यामधील १६ हजार ७०० विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. हे सर्व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयीन स्तरावर को-ओर्डीनेटर द्वारे देण्यात आले.

पूर्व तयारी म्हणून विद्यापीठांच्या संलग्नित सर्व प्राचार्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये त्यांना ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा मॉक टेस्टद्वारे पद्धती समजावून सांगण्यात आल्या. त्याशिवाय ५४८ ऑनलाईन परीक्षेसाठी को-ऑर्डीनेटरची नेमणूक करण्यात आली आहे. यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देताना अडचण उद्भवल्यास त्यांच्या मदतीसाठी ही टीम तयार ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बरीच मदतही झाली.

सध्याच्या कोव्हीड-१९ या महामारीला रोखण्यासाठी निर्धारित परीक्षा केंद्रांना आर्थिक सहाय्य करण्यात आले. यामध्ये निर्जन्तुकीकरण, ऑक्सीमीटर, थर्मल स्कॅनिंग मशीन, मास्क इत्यादी खरेदीचा समावेश होता. यासाठी महाविद्यालयांना आर्थिक सहाय्य देण्यात आले. ऑफलाईन परीक्षेदरम्यान कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. या उन्हाळी २०२० परीक्षेसाठी ५० हजार विद्यार्थी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा देत आहेत. या परीक्षेसाठी सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एकूण २ हजार १५३ प्रश्नपत्रीकांद्वारे परीक्षा घेण्यात येत आहेत.

परीक्षा सुरू झाल्यानंतर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि परीक्षा मंडळाचे सदस्य यांनी वेळोवेळी महाविद्यालयांना भेटी दिल्या. दरम्यान त्यांनी ऑफलाईन परीक्षेसाठी महाविद्यालाच्या तयारीचेही निरीक्षण केले. १५ ऑक्टोबर रोजी पहिला दिवस असल्याकारणाने आणि तसेच काही तांत्रिक अडचण असल्याने या दिवसाची परीक्षा एक ते दोन तास उशिरा सुरू झाली होती. १६ ऑक्टोबर रोजी काही परीक्षा केंद्रावर तांत्रिक अडचणींमुळे वेळेवर प्रश्नपत्रिका पोहचली नाही. त्यामुळे त्या दिवसाचा पेपर रद्द करण्यात आला होता. सदर पेपर १७ ऑक्टोबर रोजी घेण्यात आला आणि १७ ऑक्टोबरचे पूर्वनियोजित सर्व पेपर हे २८ ऑक्टोबर रोजी घेण्यात आले. असे सुरुवातीच्या दोन दिवसातील अडचणी सोडल्यास बाकी परीक्षा सुरळीत चालू आहेत.

उन्हाळी २०२० ही परीक्षा दरवर्षीच्या परीक्षेप्रमाणेच आहे. कोव्हीड-१९ च्या परिस्थीतीमध्ये एमसीक्यू पद्धतीने जरी ही परीक्षा घेतली असली तरी त्यामध्ये वेगळे असे काही नाही. निकाल लागल्यानंतर विद्यापीठाच्या वतीने रीतसर गुणपत्रिका व पदवीप्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. पदवी प्रमाणपत्र अथवा गुणपत्रिका वेगळी अशी काही राहाणार नाही किंवा त्यावर कोव्हीड-१९ च्या पार्श्वभूमीचा संबंध राहणार नाही. विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षेदरम्यान ज्या विद्यार्थ्यांच्या (नेट, सेट व सीईटी) इतर परीक्षा आल्या. त्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्यात येणार आहेत. शिवाय पदवी, पदव्युत्तर, व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षेच्या तांत्रिक अडचणीमुळे जर काही विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहिले असतील तर अशा विद्यार्थ्यांची अतिरिक्त परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात येईल. सध्या परीक्षा सुरळीतपणे चालू असल्यामुळे त्या ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होतील. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन ३१ ऑक्टोबर रोजी या जास्तीत जास्त परीक्षांचे निकाल घोषित करेल अशी अपेक्षा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केली.

यावेळी पत्रकार परिषदेस कुलगुरु डॉ.उद्धव भोसले, प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, अंतरविद्याशाखीय अभ्यास अधिष्ठाता डॉ. वैजयंता एन. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी एन. सरोदे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - नांदेडच्या कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड घट, जिल्ह्यात केवळ 707 रुग्णावर उपचार सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.