ETV Bharat / state

केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत - अशोक चव्हाण

पालकमंत्री अशोक चव्हाण
पालकमंत्री अशोक चव्हाण
author img

By

Published : Feb 13, 2021, 10:27 PM IST

नांदेड - केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत आहे. या धोरणामुळे दोन कारखाने विकावी लागले. साखरेला कमी भाव तर ऊसाला जादा भाव द्यावा लागला. यामुळे कारखाने तोट्यात आले ही तफावत दूर करण्यासाठी तीन वर्षे केंद्राकडे पाठपुरावा केल्या नंतर साखरेच्या एम.एस.पी मध्ये वाढ झाली आहे. साखरेच्या तुलनेत ऊसाला भाव ठरविण्यात यावा. केंद्र सरकारकडे 18 कोटी बाकी आहे. यावर व्याज मिळत नाही पण कारखान्याला व्याज मागण्यात येत आहे. साखर उद्योगाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. असे प्रतिपादन भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत केले.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची 27 वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना परिसरातील मैदानावर संपन्न झाली. या सभेला कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पालकमंत्री अशोक चव्हाण हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

पांदण व गाव रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार-

भाऊरावच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलतांना चव्हाण म्हणाले की, यंदा चांगला पाऊस झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. पाणी पाळ्यांचे योग्य नियोजन लावण्यात आले आहे. तसेच पांदण व गाव रस्त्यांना क्रमांक देण्यात येत आहेत.

जे सरपंच चांगले काम करतील त्यांच्या पाठीशी राहणार-

जिल्ह्यातील जे सरपंच गावात चांगले काम करतील त्यांच्या पाठीशी मी राहील. भाऊराव कारखान्याची निवडणूक जवळ आल्याने विरोधक दिशाभूल करतील त्यांच्या वर विश्वास ठेवू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. गेल्या 27 वर्षात संस्था चांगल्या प्रकारे चालवली आहे. जिल्ह्यातील कारखाने बंद पडले आहेत. साखरेला भाव परवडत नसल्यामुळे इथेनाॅल निर्मिती, रस विक्री याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अशोक चव्हाण यांनी केले.

16 विषयाचे वाचन व अनुमोदन-

या सभेला उपाध्यक्ष प्रा कैलास दाड, नरेंद्र चव्हाण, काॅग्रेसचे जिल्हाधक्ष गोविंदराव शिंदे, बाजार समितेचे माजी सभापती बी. आर. कदम, श्यामराव पाटील टेकाळे, बालाजी गव्हाणे, मारोतराव गव्हाणे, आनंदराव कपाटे, मारोती सोमवारे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. सभेत संचालकांनी सभे पुढील 16 विषयांचे वाचन केला. त्याला उपस्थित सभासदांनी अनुमोदन दिले. यासभेचे सुत्रसंचलन शिवाजीराव धर्माधिकारी यांनी केले तर आभार प्रवीण देशमुख यांनी मानले. यावेळी कारखाण्याचे कार्यकारी संचालक एस.आर पाटील, भगवान तिडके, संजय भोसले,व्यंकटी राऊत, संजय लोणे, सुधाकर इंगळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा- मेळघाटातील २४ गावांचा संसदेत गाजला मुद्दा... पण ग्राऊंड रियालिटी वेगळीच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.