ETV Bharat / state

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एकेकाळचे कट्टर समर्थक एकमेकांच्या विरोधात - nanded election news

एकेकाळचे कट्टर समर्थक जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. बँकेच्या उमरी तालुका मतदारसंघात भाजपकडून कैलाश देशमुख तर काँग्रेसकडून संदीप कवळे निवडणूक मैदानात आहेत.

nanded election
उमेदवार
author img

By

Published : Mar 29, 2021, 4:36 PM IST

Updated : Mar 29, 2021, 4:47 PM IST

नांदेड - एकेकाळचे कट्टर समर्थक जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. बँकेच्या उमरी तालुका मतदारसंघात भाजपकडून कैलाश देशमुख तर काँग्रेसकडून संदीप कवळे निवडणूक मैदानात आहेत. मारोतराव कवळे हे बापूसाहेब गोरठेकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात, मात्र गेल्या महिन्यात कवळे यांनी पुत्रासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे संबंध जिल्ह्याचे लक्ष बँकेच्या उमरी मतदारसंघाकडे लागल आहे. गोरठेकर यांची उमरी तालुक्यात मजबूत पकड आहे, तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांच्या पाठिंब्यावर आपण ही निवडणूक जिंकू असा विश्वास कवळे गटाला वाटत आहे.

प्रतिक्रिया देताना संदीप कवळे व मारोतराव कवळे

एकेकाळी होते कट्टर समर्थक

नांदेड जिल्हा बँकेच्या उमरी तालुका मतदारसंघात भाजपकडून कैलाश देशमुख रिंगणात उतरले आहेत. तर काँग्रेसकडून संदीप कवळे निवडणुकीच्या मैदानात आहेत. संदीप कवळे यांचे वडील मारोतराव कवळे हे दिग्गज नेते बापूसाहेब गोरठेकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. जवळपास वीस ते पंचवीस वर्षे राष्ट्रवादी आणि गोरठेकर घराण्याचे ते समर्थक होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविली होती. गेल्या महिन्यात मारोतराव कवळे यांनी पुत्र संदीप कवळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला आणि काँग्रेसचा झेंडा हाती धरला. त्यामुळे संबंध नांदेड जिल्ह्याचे लक्ष बँकेच्या उमरी मतदारसंघ निवडणुकीकडे लागलं आहे.

हेही वाचा - वाझे प्रकरणातील 'त्या' नंबर प्लेटचे औरंगाबाद कनेक्शन, कॉम्प्युटर-लॅपटॉपही सापडले

एक उद्योजक म्हणूनही मिळवली आहे ख्याती

कवळे गुरुजी या नावाने जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले मारोतराव कवळे हे एक यशस्वी उद्योजक आहेत. पतपेढीच्या माध्यमांतून कवळे गुरुजींनी हजारो शेतकऱ्यांना आर्थिक हाथभर लावत पायावर उभे केलंय. दूध, गुळाच्या व्यवसायात त्यांनी अनेक शेतकऱ्यांना आपल्याशी जोडलेलं आहे. माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे कट्टर समर्थक असलेले कवळे गुरुजी त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते.

गोरठेकरांची उमरी तालुक्यावर पकड

दरम्यान, भाजप नेते बापूसाहेब गोरठेकर यांची उमरी तालुक्यात मजबूत पकड आहे, मात्र मंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठिंब्यावर आपण ही निवडणूक जिंकू असा विश्वास कवळे गटाला वाटत आहे. बापूसाहेब गोरठेकर यांनी जुलै 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी गोरठेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष होते बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि तितकेच ताकदवान नेते म्ह्णून ओळखले जातात. जुन्या पिढीतील शब्द पाळण्याचा त्यांचा गुण आजही कायम आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या विलक्षण मोठी आहे. भाजपप्रवेशानंतर बापूसाहेब गोरठेकर यांना भाजपकडून भोकर विधानसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती.जवळपास 97 हजारांच्या मताधिक्याने अशोक चव्हाण विजयी झाले होते. गोरेठेकरांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता.

गोरठेकरांचा पराभव होणार की वचपा काढणार

नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत एकेकाळचे कट्टर समर्थक एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. भाजप नेते बापूसाहेब (श्रीनिवास) गोरठेकर यांचे कट्टर समर्थक राहिलेल्या कवळे पितापुत्रांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता मंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठिंब्यावर भाजपचा धुव्वा उडवण्याचा निर्धार कवळेंनी व्यक्त केला आहे. या आधी विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांनी गोरठेकरांना पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे गोरठेकर पुन्हा काँग्रेसकडून पराभूत होणार, की पराभवाचा वचपा काढणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा - 'दीपाली चव्हाणने मृत्यूपुर्वी लिहिलेले पत्र नीट वाचा अन् रेड्डीला सहआरोपी करा'

Last Updated : Mar 29, 2021, 4:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.