ETV Bharat / state

मुस्लीम बांधवांनी पवित्र रमजान महिन्यात शासनाच्या सूचनांचे पालन करावे; पोलीस अधीक्षकांचे आवाहन - muslim

सर्व मुस्लीम बांधवानी त्यांच्या घरातच नियमीत नमाज पठण व इफ्तार पार्टी आदी धार्मिक कार्य पार पाडावे. इतर कोणत्याही लोकांना धार्मिक कार्यक्रमात समाविष्ठ करू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले.

sp vijaykumar magar appeal to muslim community follow rules
मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान महिन्यात शासनाच्या सूचनांचे पालन करावे; पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांचे आवाहन
author img

By

Published : Apr 24, 2020, 9:52 AM IST

नांदेड - रमजान महिन्यामध्ये मुस्लीम समाजामध्ये मोठ्या संख्येने मशिदीमध्ये जाऊन तसेच सार्वजनिकरित्या नमाज पठण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुस्लीम समाजातील लोक नमाज, तरावीह व इफ्तार पार्टीसाठी एकत्र येतात. सद्य:स्थिती विचारात घेता, अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यामधून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लीम बांधवांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. त्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १४ मार्चपासून संचारबंदी सुरू आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याबाबत १४ मार्चला सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सुरू असलेल्या संचारबंदीत सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पवित्र रमजान महिन्यामध्ये काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत मुस्लीम बांधव मशीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार पार्टीसाठी एकत्र येवू नये. घराच्या किंवा इमारतीच्या छतावर एकत्र येवून नियमित नमाज पठण अथवा इफ्तार पार्टी करण्यात येवू नये. मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, इफ्तार पार्टी करण्यात येवू नये.

लोकांकडून कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटूंबिक कार्यक्रम एकत्रित येवून साजरे होणार करू नयेत. सर्व मुस्लीम बांधवानी त्यांच्या घरातच नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तार पार्टी आदी धार्मिक कार्य पार पाडावे. इतर कोणत्याही लोकांना धार्मिक कार्यक्रमात समाविष्ठ करू नये.

वरील दिलेल्या सूचनांचे जनतेने काटेकोरपणे पालन करुन आपले कर्तव्य पार पाडून समाजातील लोकांच्या व आपल्या कुटूंबियांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे समाजाच्या सुरक्षिततेसाठी नेमून दिलेली कर्तव्य पार पाडून समाजापुढे आदर्श ठेवूया. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची सर्वांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करुन कोरोना विषाणूविरुद्धचा आपला लढा जिंकण्याची मनीषा आपण सर्वजण मिळून बाळगू या...! असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी नांदेड जिल्ह्यातील जनतेला केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.