नांदेड - दक्षिण पश्चिम रेल्वेने कळविल्यानुसार दिनांक ७ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१दरम्यान बंगळुरू-नांदेड-बंगळुरू उत्सव विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे, अशी माहिती नांदेड विभागीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
यानुसार, १. गाडी संख्या ०६५१९ बंगळुरू ते हुजूर साहिब नांदेड उत्सव विशेष गाडी दिनांक ७ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२०दरम्यान बंगळुरू ते नांदेड रेल्वे स्थानकादरम्यान धावेल. २. गाडी संख्या ०६५२० नांदेड ते बंगळुरू उत्सव विशेष गाडी हुजूर साहिब नांदेड ते बंगळुरू रेल्वे स्थानकावरून दिनांक ९ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१दरम्यान धावेल. ३. या गाडीच्या वेळा नियमित गाडी संख्या १६५९३/१६५९४ नांदेड-बंगळुरू-नांदेड गाडीच्या वेळापत्रकानुसार असतील.