ETV Bharat / state

नांदेड : पत्नीला परत घेऊन जाण्यास विरोध केल्याने जावयाने फोडले सासूचे डोके - राहुल आष्टुरकर

राहुलची पत्नी आपल्या मुलीसह माहेरी आली होती. राहुल मध्यरात्री सासरी गेला. रात्रीच पत्नी आणि मुलीला घेऊन जाणार असल्याचे त्याने सासूला सांगितले. यावर सासूने विरोध दर्शवला असता त्याने सासूला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, मारहाण करत काठीने सासूचे डोके फोडून त्यांना गंभीर जखमी केले.

crime
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Dec 16, 2019, 12:36 PM IST

नांदेड - माहेरी आलेल्या पत्नीला परत घेऊन जाण्यासाठी विरोध करणाऱ्या सासूचे जावयाने डोके फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुल अष्टुरकर, असे जावयाचे नाव आहे. शहरातील सोमेश कॉलनीत हा प्रकार घडला.

हेही वाचा - वसईत अमेरिकेतून परतलेल्या सुनेची सासूकडून हत्या, डोक्यात घातला फ्लॉवरपॉट

राहुलची पत्नी आपल्या मुलीसह माहेरी आली होती. राहुल रविवारी मध्यरात्री सासरी गेला. रात्रीच पत्नी आणि मुलीला घेऊन जाणार असल्याचे त्याने सासूला सांगितले. यावर सासूने विरोध दर्शवला असता, त्याने सासूला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, मारहाण करत काठीने सासूचे डोके फोडून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी सासूने दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात आरोपी राहुल अष्टुरकरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल आडे पुढील तपास करत आहेत.

Intro:नांदेड : जावयाने फोडले सासूचे डोके.

नांदेड : पत्नीला घेऊन जाण्यास विरोध करणाऱ्या सासू डोके जावयाने फोडल्याची घटना काल रात्री नांदेड शहरात घडली.Body:
शहरातील सोमेश कॉलनीतील कोटलवार यांच्या
घरासमोर राहणाऱ्या एका महिलेने विवाहीत मुलगी
व तिच्या नातींना आपल्या घरी आणले होते. जावई
राहुल आष्टुरकर हा मध्यरात्री सासरवाडीला गेला आणि आताच माझी पत्नी व मुलगी माझ्या सोबत घेऊन जाणार आहे, असे म्हणाला.तेव्हा सासूने विरोध दर्शविला असता त्याने आता का पाठवत नाहीत म्हणून सासूला शिविगाळ करीत थापडबुक्क्याने मारहाण केली आणि कड्याने सासूचे डोके फोडून गंभीर जखमी केले.Conclusion:
याप्रकरणी सासूने दिलेल्या फिर्यादी वरून वजिराबाद पोलीस ठाण्यात आरोपी राहुल अष्टुरकर विरुध्द गुरनं ३८७/१९ कलम ३२४, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोहेकाँ आडे पुढील तपास करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.