नांदेड- जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव भारतातही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. संपूर्ण देश 21 दिवस लॉकडाऊन राहणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. त्यामुळे अनेकजण घरात अन्न पाण्यावाचून अडकले आहेत. अशा स्थितीत घरात अन्न पाण्यावाचून अडकलेल्या असंख्य विद्यार्थ्याना घरपोच जेवण देण्यात येत आहे. नांदेडमधील समाजसेवक अॅड. दिलीप ठाकूर यांनी लॉयन्सचा डब्बा हा उपक्रम सुरू केला आहे.
अनेक दानशूर मंडळींच्या मदतीने घरोघरी जाऊन जेवणाचा डब्बा देण्याचे काम ते करत आहेत. दिलीप ठाकूर यांच्यासह शेकडो स्वयंसेवक यामध्ये काम करत आहेत. या जेवणाच्या डब्ब्यामुळे घरातच अडकून पडलेल्या असंख्य विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.