ETV Bharat / state

तेरवीचा खर्च टाळून खासदार हेमंत पाटील यांचा सामाजिक उपक्रम; रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान

सध्या सगळीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. बाहेर गावावरून आलेल्या रुग्णांचे आणि नातेवाईकाचे जेवणाअभावी प्रचंड हाल होत आहेत. त्यांना मदत व्हावी या दृष्टीकोनातून नांदेड आणि हिंगोली येथील रुग्णालयात दररोज एक हजार रुग्ण नातेवाईकांना जेवणाची व्यवस्था करण्यासाठी "शिदोरी" या सामाजिक उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.

सामाजिक उपक्रम
सामाजिक उपक्रम
author img

By

Published : May 6, 2021, 7:07 PM IST

नांदेड - ‘तेरवी’ या हिंदू धर्मातील संस्कारावरील अनाठायी खर्च टाळून त्या खर्चातून गरजू रुग्ण आणि नातेवाईकांना अन्नदान देण्याच्या उद्देशाने खासदार हेमंत पाटील व गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी ‘शिदोरी’ या सामाजिक उपक्रमाची सुरवात केली. येथील श्री.गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

खासदार हेमंत पाटील यांच्या सासू व गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मातोश्री तथा यवतमाळ येथील पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष कै. बाबासाहेब महल्ले यांच्या पत्नी कै. पुष्पाताई महल्ले यांचे 27 एप्रिल रोजी कोरोना आजाराने मुंबई येथे निधन झाले होते. शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून मुंबई (वरळी)येथील मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंदू धर्मात मृत्यूनंतर तेरवी संस्काराला महत्व आहे, परंतु खासदार हेमंत पाटील आणि राजश्री पाटील यांनी या कार्यक्रमावर होणारा अनाठायी खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरविले. जेणेकरून समाजातील गोरगरीब जनतेला याचा लाभ झाला होईल. सध्या सगळीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. बाहेर गावावरून आलेल्या रुग्णांचे आणि नातेवाईकाचे जेवणाअभावी प्रचंड हाल होत आहेत. त्यांना मदत व्हावी या दृष्टीकोनातून नांदेड आणि हिंगोली येथील रुग्णालयात दररोज एक हजार रुग्ण नातेवाईकांना जेवणाची व्यवस्था करण्यासाठी "शिदोरी" या सामाजिक उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.

सकाळी 10 ते 1 आणि सायंकाळी 6 ते 8 या वेळेत रुग्ण, नातेवाईकांना जेवण दिले जाणार आहे. हा उपक्रम पुढील एक महिना चालणार आहे. या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार हेमंत पाटील आणि राजश्री पाटील यांनी केले आहे. यावेळी खासदार हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील, अधिष्ठाता डॉ.म्हैसेकर, मनपा आयुक्त डॉ.लहाने, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, जिल्हाप्रमुख आनंद तिडके, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, उपजिल्हाप्रमुख पप्पू जाधव आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.