ETV Bharat / state

नांदेडमध्ये एनआयए एटीएस गो बॅकची घोषणाबाजी, शहरात १ तर परभणीत चौघांना अटक - परभणीत चौघांना अटक

एनआयएने नांदेड येथून एकास तर परभणीतून चौघांना अटक केली. या पाचही जणांना न्यायालयाने आठ दिवसाची कोठडी सुनावली आहे. एनआयए आणि एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या पाचही जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी मोठी गर्दी जमा झाली होती. सुनावणी सुरू असताना पीएफआय जिंदाबाद, एनआयए गो बॅक, एटीएस गो बॅक अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली (Slogans of go back ATS and NIA in Nanded).

नांदेडमध्ये एनआयए एटीएस गो बॅकची घोषणाबाजी

author img

By

Published : Sep 22, 2022, 10:34 PM IST

Updated : Sep 22, 2022, 10:42 PM IST

नांदेड - राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) टेरर फंडिंग प्रकरणात देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांवर धाडी टाकल्या. एनआयएने नांदेड येथून एकास तर परभणीतून चौघांना अटक केली. या पाचही जणांना न्यायालयाने आठ दिवसाची कोठडी सुनावली आहे. तर एक जण फरार आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचे एक पथक बुधवारी रात्री नांदेड शहरात दाखल झाले होते. या पथकाने शहरातील देगलूर नाका भागातून मेराज अन्सारी या पीएफआयच्या सदस्याला ताब्यात घेतले आहे.

नांदेडमध्ये एनआयए एटीएस गो बॅकची घोषणाबाजी

तिघांची केली होती चौकशी - महिनाभरपूर्वीच नांदेडमध्ये एनआयएची दिल्लीची टीम पहाटे ३ वाजता धडकली होती. त्यावेळी देगलूर नाका भागातून एका मौलवीसह अन्य तिघांना ताब्यात घेऊन तब्बल १२ तास चौकशी केली होती. त्यानंतर नोटीस देऊन त्यांना सोडले होते. त्यानंतर बुधवारी रात्री एनआयएचे पथक पुन्हा नांदेड शहरात दाखल झाले. स्थानिक एटीएसच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन देगलूर नाका भागात छापा मारला. पीएफआयच्या मेराज अन्सारी याला ताब्यात घेतले. अन्सारी याचे भागात किराणा आणि इतर वस्तू विक्रीचे दुकान आहे. दरम्यान, परभणीतूनही अब्दुल सलाम (३४), महोम्मद निसार (४१, परभणी), महोम्मद जाविद (३५), अब्दुल करीम (३५) या चौघांना एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

आठ दिवसांची कोठडी सुनावली - नांदेड येथून ताब्यात घेतलेला मेहराज अन्सारी तसेच परभणी येथून ताब्यात घेतलेले अब्दुल सलाम, महोम्मद निसार, महोम्मद जाविद, अब्दुल करीत या पाचही जणांना २२ सप्टेंबर रोजी येथील न्यायालयासमोर उभे करण्यात आले. यावेळी न्यायालयाने पाचही जणांना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली. एनआयए आणि एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या पाचही जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी मोठी गर्दी जमा झाली होती. सुनावणी सुरू असताना पीएफआय जिंदाबाद, एनआयए गो बॅक, एटीएस गो बॅक (Slogans of go back ATS and NIA in Nanded) अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Last Updated : Sep 22, 2022, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.