ETV Bharat / state

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पावर सहा नवीन उच्च पातळी बंधाऱ्यांचा मार्ग मोकळा

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाची तूट भरून काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून, राज्य शासनाने नांदेड जिल्ह्यातील नवीन प्रस्तावित सहा उच्च पातळी बंधाऱ्यांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र निर्गमित केले आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पावर सहा नवीन उच्च पातळी बंधाऱ्यांचा मार्ग मोकळा
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पावर सहा नवीन उच्च पातळी बंधाऱ्यांचा मार्ग मोकळा
author img

By

Published : Jun 19, 2021, 8:00 AM IST

नांदेड: उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाची तूट भरून काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून, राज्य शासनाने नांदेड जिल्ह्यातील नवीन प्रस्तावित सहा उच्च पातळी बंधाऱ्यांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र निर्गमित केले आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश..

अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात मागील पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा चालवला होता. त्यानुसार शासनाने सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून पांगरा साप्ती (ता. हदगाव) येथील ९.८० दशलक्ष घनमीटर, गोजेगाव (ता. हदगाव) येथील १३ दशलक्ष घनमीटर, बनचिंचोली (ता. हदगाव) येथील ९.८० दशलक्ष घनमीटर, घारापूर (ता. हिमायतनगर) येथील ९ दशलक्ष घनमीटर, किनवट येथील १०.५७ दशलक्ष घनमीटर तर माळेगाव (ता. किनवट) येथील ९.६९ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र दिले आहे. या सहा बंधाऱ्यांची मिळून एकूण पाणी उपलब्धता क्षमता ८१. ८६ दशलक्ष घनमीटर असणार आहे.

पाणी उपलब्धता प्रमाणपत्र निर्गमित; पुढील कार्यवाही गतीमानतेने करणार..

हदगाव, हिमायतनगर व किनवट तालुक्यातील या नवीन सहा प्रस्तावित उच्च पातळी बंधाऱ्यांच्या उभारणीचा मार्ग प्रशस्त झाल्याने सिंचनाखालील क्षेत्राची तूट भरून निघण्यास मोठी मदत होईल. तसेच या तालुक्यांमध्ये सिंचन आणि पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार आहे. पाणी उपलब्धता प्रमाणपत्र निर्गमित झाल्याबद्दल पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला असून, नांदेड जिल्हावासियांची एक महत्त्वाची मागणी पू्र्ण झाली याबद्दल समाधान व्यक्त केले. या बंधाऱ्यांची उभारणी करण्यासाठी पुढील कार्यवाही देखील गतिमानतेने करणार असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.