नांदेड - शहरात आज पुन्हा 9 कोरोना रुग्णांची भर पडली असून, नांदेड शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 125 वर पोहोचली आहे. आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर सकाळी 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
आजची कोरोना परिस्थिती अशी -
• आत्तापर्यंत एकूण संशयित – 3039
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-2738
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण – 1379
• अजून निरीक्षणाखाली असलेले – 242
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये – 71
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -2667
• आज घेतलेले नमुने – 121
• एकूण नमुने तपासणी- 3082
• एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 125
• पैकी निगेटिव्ह – 2740
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 80
• नाकारण्यात आलेले नमुने – 14
• अनिर्णित अहवाल – 119
• कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले – 55
• कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 6
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 1 लाख 31 हजार 460 या सर्वांना क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.: