ETV Bharat / state

Sanjay Biyani Murder Case : सहा आरोपी, सात राज्य; बियाणी हत्या प्रकरणात पोलिसांचा उलगडा

बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्यात आता नांदेड पोलिसांनी मोठा उलगडा केला आहे. याप्रकरणात नांदेड पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली ( Six Accused Arrested Sanjay Biyani Murder Case ) आहे.

Sanjay Biyani
Sanjay Biyani
author img

By

Published : Jun 1, 2022, 5:21 PM IST

नांदेड - येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्यात आता नांदेड पोलिसांनी मोठा उलगडा केला आहे. याप्रकरणात नांदेड पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. खंडणी प्रकरणातून ही हत्या झाल्याचे समोर आले ( Six Accused Arrested Sanjay Biyani Murder Case )आहे.

पाच एप्रिलला संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या घराससमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येंनतर पोलिसांविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. तेव्हापासून याप्रकरणाचा पोलीस तपास करत होते. पोलिसांनी महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगाणा व कर्नाटक या राज्यात तपास केला होता. तपासादरम्यान आतापर्यंत सहा आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. तपासात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी अटक करण्यात आलेल्यामध्ये इंद्रपालसिंघ ऊर्फ सनी पि. तिरथसिंघ मेजर (वय ३५ वर्ष), मुक्तेश्वर ऊर्फ गोलू विजय मंगनाळे (वय २५ वर्ष), सतनामसिंघ ऊर्फ सत्ता पि दलबिरसिंघ शेरगिल (वय २८ वर्ष), हरदिपसिंध ऊर्फ सोनु पिनीपाना पि. सतनामसिंध बाजवा (वय ३५ वर्ष), गुरमुखसिंध ऊर्फ गुरी पि. सेवक (वय २४ वर्ष), करणजितसिंघ पि. रघबिरसिंघ साहु (वय ३० वर्ष), सर्व रा. नादेंड, अशी आरोपींची नावे आहे. दरम्यान, यानंतरही कोणाला खंडणीसाठी मागणी होत असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन, पोलिसांनी केले आहे.

काय आहे प्रकरण? - नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींवर राहत्या घराबाहेर चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्या हल्ल्यात संजय बियाणी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला होता. खंडणी प्रकरणातून त्यांची हत्या झाल्याचा अंदाज तेव्हा वर्तवण्यात आला होता.

हेही वाचा - नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ई़डीचे समन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.