ETV Bharat / state

Maharashtra Shaktipeetha Chitrarath at Rajpath : साडेतीन शक्तीपीठांचे चित्ररथात देखावे; राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथात माहूरची रेणुकामाता

author img

By

Published : Jan 17, 2023, 7:24 PM IST

महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन २०२३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात होणार आहे. याबाबत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयातून अधिकृत माहिती मिळाली आहे. या चित्ररथात माहूरच्या रेणुकादेवीच्या देखाव्याचाही समावेश आहे.

Maharashtra Shaktipeethas Chitrarath On Rajpath
चित्ररथात माहूरची रेणुकामाता

राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथात माहूरच्या रेणुकामातेचं दर्शन

नांदेड : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांना प्रचंड महत्व आहे. हीच बाब ध्यानात घेऊन यंदा २०२३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात या शक्तीपीठांचा देखावा सादर केला जाणार आहे. यामध्ये कोल्हापूर, तुळजापूर, श्रीक्षेत्र माहूर व वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे.

महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर दिसणार : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाचा समावेश होणार आहे. अनेक दिवसांपासून दिल्लीतील परेडमध्ये चित्ररथ असणार का?, याबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत असून; मराठवाडा मुक्ती संग्रामाचेही हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्ली येथील राजपथावरील परेडमध्ये समाविष्ट असावा, अशी विनंती मुनगंटीवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना केली होती. त्यामुळे आता प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारीला महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर दिसणार आहे.

देवीचा जागरण-गोंधळही होणार : आदिमाया शक्तींचा साडेतीन शक्तीपीठांचा चित्ररथ यावेळी महाराष्ट्र सादर करणार आहे. महाराष्ट्राने आगामी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी राज्यातील साडेतीन शक्तिपीठांचा महिमा वर्णन करणाऱ्या देखाव्याची निवड केली आहे. कोल्हापूर, तुळजापूर, श्रीक्षेत्र माहूर व वणीची सप्तशृंगी देवी या पीठांचे महात्म्य या चित्ररथाच्या माध्यमातून तसेच गीतसंगीताच्या माध्यमातून राजपथावर उलगडेल. त्याबरोबरच स्त्रीशक्तीचा जागर देखील होणार आहे. विशेषतः या देखाव्याबरोबर देवीचा जागरण-गोंधळ सादर करणाऱ्या काही लोककलाकारांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राने गाजवला सांस्कृतिक इतिहास : १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिली ११ वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झाला नव्हता. १९८० मध्ये शिवराज्याभिषेक या विषयावरील चित्ररथास प्रथमच अव्वल पारितोषिक मिळाले. त्यानंतर १९८३- बैलपोळा विषयावरील राज्याचा चित्ररथ सर्वोत्तम ठरला.

चित्ररथांच्या प्रथम क्रमांकाची हॅटट्रिक : १९९३ मध्ये गणेशोत्सव, १९९४ मध्ये 'शताब्दी' व त्यापुढच्या १९९५ मध्ये हापूस आंबे आणि बापू विषयांवरील माहिती देणारा चित्ररथ सादर करण्यात आला होता. चित्ररथांनी प्रथम क्रमांक मिळविण्याची हॅटट्रिक केली. १९८६, १९८८ व २००९ मध्ये महाराष्ट्र राज्याचा अग्रक्रमांक थोडक्यात हुकला होता. तसेच २०१४ मध्ये नारळीपौर्णिमा, २०१५- पंढरीची वारी व २०१८ मध्ये शिवराज्याभिषेक या विषयांवरील महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये राज्याने महात्मा गांधी यांच्या चले जाव चळवळीवर आधारित चित्ररथ सादर केला. २०२१ मध्ये 'वारकरी संत परंपरा' या विषयावर आधारित चित्ररथ सादर करण्यात आला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आठ फूट उंचीची आसनस्थ मूर्ती हे या चित्ररथाचे आकर्षण होते. मागच्यावर्षी २०२२ जैवविविधता या विषयावरील राज्याचा चित्ररथ जनतेची पसंती मिळविणारा अव्वल चित्ररथ ठरला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.