ETV Bharat / state

मोदी की बडी-बडी बातों से पेट नही भरता - शत्रुघ्न सिन्हा - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 बातमी

'नोटबंदीचा निर्णय कोणाशी विचारविनिमय न करता घेण्यात आला. या निर्णयामुळे देश बरबाद होत असून तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योग बंद पडत आहेत. दररोज देशभरात तीन लाख रोजगार जात आहे. देशाचा विकास दर पाच पर्यंत आला आहे.'

शत्रुघ्न सिन्हा सभा
author img

By

Published : Oct 17, 2019, 8:45 AM IST

नांदेड- "पोटाला भूक लागली आणि कुणी भजन म्हणत असेल तर पोट भरत नाही. गोष्टी तर खूप मोठ्या-मोठ्या ऐकायला मिळत आहेत. पण प्रत्यक्षात मात्र याचा काहीच उपयोग नाही. 'बडी-बडी बातों से पेट नही भरता'," अशी टिका आपल्या खास शैलीत काँग्रेसचे नेते तथा अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी यांचे नाव न घेता केली. ते भोकर येथील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या अर्धापूर येथील सभेत बोलत होते.

शत्रुघ्न सिन्हा सभा

हेही वाचा- पुण्यात मेट्रोपेक्षा वॉटर ट्रान्सपोर्ट प्रकल्प महत्वाचा - प्रकाश आंबेडकर

यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे भाऊरावचे अध्यक्ष गणपतराव तिडके, अखिल भारतीय सेक्रेटरी संपत कुमार, गोविंदराव शिंदे सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, शहराध्यक्ष राजु शेटे, राष्ट्रवादीचे नेते संतोष गव्हाणे आदी उपस्थित होते.

३७० कलम रद्द करताना सर्वांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते
'नोटबंदीचा निर्णय कोणाशी विचारविनिमय न करता घेण्यात आला. या निर्णयामुळे देश बरबाद होत असून तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योग बंद पडत आहेत. दररोज देशभरात तीन लाख रोजगार जात आहे. देशाचा विकास दर पाचपर्यंत आला आहे. महाराष्ट्रात निवडणुका होत असताना महाराष्ट्राविषयी बोलावे. मोदी सरकारने ३७० कलम रद्द केले हे चांगले झाले. पण हा निर्णय घेते वेळेस सर्वांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. आता काश्मीरमध्ये काय परिस्थिती आहे हे जनतेला कळली पाहीजे. सरकारने पारदर्शकता दाखवावी. अशोक चव्हाण सारख्या विद्वान नेत्याला निवडून द्या,' असे आवाहनही सिन्हा यांनी यावेळी केले.

भाजप पक्ष का सोडला

'मी दलबदलू नाही. मी भाजपमध्ये होतो त्या वेळी शेतकरी, कामगार, महिला सुरक्षा, रोजगार याविषयी परखडपणे मत मांडले. ते मत पक्षातील काही नेत्यांना पटले नाही. तसेच नोटबंदीच्या विरुद्ध प्रथम मीच आवाज उठविला. जीएसटीने सर्व गोंधळ उडविला आहे. तीस वर्षानंतर प्रथमच खऱ्या रस्त्यावर आलो आहे. सरकारने पारदर्शकते विषयी न बोलता कृती आणि उक्ती सारखी केली पाहिजे. मतदान यंत्राविषयीची सत्यता समोर आली पाहीजे, असे मत सिन्हा यांनी व्यक्त केले.

चव्हाणांची वाट लावायला तुम्ही का दाऊद चे भाऊ आहेत काय ?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, की एका चव्हाणाची वाट लावली आहे. आता दुसऱ्या चव्हाणांची वाट लावणार आहेत. चव्हाणांची वाट लावायला तुम्ही का दाऊद चे भाऊ आहेत काय? ,असा टोला खासदार चिखलीकर यांचे नाव न घेता त्यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्री नांदेडला येतात पण येथील प्रश्नाविषयी काही बोलत नाहीत. युतीचे सरकार म्हणजे केवळ बनवाबनवीचे सरकार आहे. अशा लबाड सरकारला खाली खेचा, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन छत्रपती कानोडे यांनी केले तर आभार प्रवीण देशमुख यांनी मानले.

Intro:मोदी के बडी-बडी बातो से पेट नही भरता-शत्रुघ्न सिन्हा

नांदेड: पोटाला भूक लागली आणि कुणी भजन म्हणत असेल तर पोट भरत नाही. गोष्टी तर खूप मोठ्या-मोठ्या ऐकायला मिळत आहेत. पण प्रत्यक्षात मात्र याचा काहीच उपयोग नाही. बडी-बडी बातो से पेट नही भरता अशी टिका आपल्या खास शैलीत काँग्रेसचे नेते तथा अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी यांचे नाव न घेता केली आहे. ते भोकर येथील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या अर्धापूर येथील सभेत बोलत होते. Body:मोदी के बडी-बडी बातो से पेट नही भरता-शत्रुघ्न सिन्हा

नांदेड: पोटाला भूक लागली आणि कुणी भजन म्हणत असेल तर पोट भरत नाही. गोष्टी तर खूप मोठ्या-मोठ्या ऐकायला मिळत आहेत. पण प्रत्यक्षात मात्र याचा काहीच उपयोग नाही. बडी-बडी बातो से पेट नही भरता अशी टिका आपल्या खास शैलीत काँग्रेसचे नेते तथा अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी यांचे नाव न घेता केली आहे. ते भोकर येथील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या अर्धापूर येथील सभेत बोलत होते.

यावेळी सिन्हा पुढे बोलताना म्हणाले की, नोटबंदीचा निर्णय कोणाशी विचारविनिमय न करता घेण्यात आला. या निर्णयामुळे देश बरबाद होत असून तरूणांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योग बंद पडत आहेत. दररोज देशभरात तीन लाख रोजगार जात आहे. देशाचा विकास दर पाच पर्यंत आला आहे. महाराष्ट्रत निवडणूका होत असतांना महाराष्ट्राविषयी बोलावे. मोदी सरकारने ३७० कलम रद्द केले हे चांगले झाले. पण हा निर्णय घेते वेळेस सर्वांना विश्वास घ्यायला पाहिजे होते. आता  काश्मीर मध्ये काय परिस्थिती आहे हे जनतेला कळली पाहीजे. सरकारने पारदर्शकता दाखवावी. अशोक चव्हाण सारख्या विद्वान नेत्याला निवडून द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले
आपण भाजप पक्ष का सोडला या बाबत बोलताना श्री सिन्हा म्हणाले की, मी दलबदलू नाही. शेतकरी, कामगार, महिला सुरक्षा, रोजगार याविषयी परखडपणे मत मांडले. ते मत पक्षातील काही नेत्यांना पटले नाही. तसेच नोटबंदीच्या विरूद्ध प्रथम मीच आवाज उठविला. जीएसटीने सर्व गोंधळ उडविला आहे.
तीस वर्षानंतर प्रथमच ख-या रस्त्यावर आलो आहे. शासनाने पारदर्शकते विषयी न बोलता कृती आणि उक्ती सारखी केली पाहिजे. मतदान यंत्राविषयीची सत्याता समोर आली पाहीजे असे मत सिन्हा यांनी व्यक्त केले.
भोकर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ बसवेश्वर विद्यालयाच्या मैदानावर सिनेअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काॅग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे भाऊरावचे अध्यक्ष गणपतराव तिडके, अखिल भारतीय सेक्रेटरी संपत कुमार, गोविंदराव शिंदे सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, शहराध्यक्ष राजु शेटे, राष्ट्रवादीचे नेते संतोष गव्हाणे आदी उपस्थित होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, एका चव्हाणाची वाट लावली आहे. आता दुस-या चव्हाणांची वाट लावणार आहे. चव्हाणांची वाट लावायला तुम्ही का दाऊद चे भाऊ आहेत काय.असा टोला खा.चिखलीकर यांचे नाव न घेता लगावला. तसेच मुख्यमंत्री नांदेडला येतात पण येथील प्रश्नाविषयी काही बोलत नाहीत. युतीचे सरकार म्हणजे केवळ बनवाबनवीचे सरकार आहे. अशा लबाड सरकारला खाली खेचा आसे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन छत्रपती कानोडे यांनी केले तर आभार प्रवीण देशमुख यांनी मानले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.