ETV Bharat / state

जनतेच्या काळजीपोटी न्यायाधीश रस्त्यावर... घरी राहण्याचे नागरिकांना आवाहन

author img

By

Published : May 11, 2020, 12:54 PM IST

भोकर न्यायालयाचे सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी लोकांच्या काळजीपोटी थेट रस्त्यावर उतरत नागरिकांना काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. भोकर शहरातील चौकात रिक्षात जाऊन ते कोरोनाबाबत जनजागृती करीत आहेत.

judge mujib sheikh
judge mujib sheikh

नांदेड- देशभरात कोरोना व्हायरसचा विळखा वाढत आहे. नांदेडमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन करीत आहे. मात्र, नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणू पासून जनतेचे रक्षण व्हावे, म्हणून जिल्ह्यात थेट सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रस्त्यावर उतरले आहेत.

जनतेच्या काळजीपोटी न्यायाधीश रस्त्यावर...

हेही वाचा- केईम रुग्णालयातील 'त्या' व्हायरल व्हिडिओचा अहवाल आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी मागवला

भोकर न्यायालयाचे सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी लोकांच्या काळजीपोटी थेट रस्त्यावर उतरत नागरिकांना काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. भोकर शहरातील चौकात रिक्षात जाऊन ते कोरोनाबाबत जनजागृती करीत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात आजवर कोरोनाचे एकूण 51 रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण फक्त महापालिका हद्दीतील आहेत. ग्रामीण भागातही कोरोनाने प्रवेश केला असून तीर्थक्षेत्र माहूर तालुक्यात एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.