ETV Bharat / state

Hola Mohalla Nanded : होला मोहल्ला वाद प्रकरणातील निर्दोषांवरील गुन्हे मागे घ्या, अवर सचिवांचे पोलीस अधीक्षकांना पत्र - नांदेड पोलीस

नांदेडच्या सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा परिसरात झालेल्या गोंधळाबाबत राज भवन कार्यलयाने दखल घेतली आहे. या २०२१ मध्ये श्री सचखंड गुरुद्वारा येथे होला मोहल्ला कार्यक्रमाच्या मिरवणुकीवरून पोलीस आणि शीख तरुणांमध्ये वाद झाला होता. या घटनेची सखोल चौकशी करुन निर्दोष तरुणांवरील गुन्हे मागे घ्या, अशी सूचना अवर सचिव जायराज चौधरी यांनी नांदेड पोलीस अधीक्षक ( Superintendent of Police ) यांना पत्राद्वारे केली आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Feb 2, 2022, 9:17 PM IST

नांदेड - येथील सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा परिसरात झालेल्या गोंधळाबाबत राज भवन कार्यलयाने दखल घेतली आहे. या 2021 मध्ये श्री सचखंड गुरुद्वारा येथे होला मोहल्ला कार्यक्रमाच्या ( Hola Mohalla Nanded ) मिरवणुकीवरून पोलीस आणि शीख तरुणांमध्ये वाद झाला होता. याबाबतीत सखोल चौकशी करावी आणि निर्दोषांवरील गुन्हे मागे घ्यावे, अशी सूचना अवर सचिव जयराज चौधरी यांनी नांदेडचे पोलीस अधीक्षक ( Superintendent of Police ) यांना पत्राद्वारे केली आहे, अशी माहिती गुरुद्वारा बोर्डचे माजी सचिव रणजितसिंग कामठेकर यांनी दिली.

माहिती देताना रणजितसिंग कामठेकर

होला मोहल्ला मिरवणुकीवरून झाला होता वाद - मागील वर्षी सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा परिसरात होला मोहल्ला कार्यक्रमावेळी कोविडच्या नियमांचे पालन न केल्यामुळे पोलिसांनी या मिरवणुकीला रोखले होते. यावरून शीख समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या होत्या. या वादात शीख तरुण आणि पोलीस यांच्या शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात काही पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते.

77 तरुणांवर दाखल आहेत गुन्हे - या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 77 तरुणांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, पोलिसांच्या करवाईवर आक्षेप घेत गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रणजितसिंग कामठेकर यांनी राज्यपालांना पत्र पाठवले होते. या प्रकरणात अनेक निर्दोष तरुणांवरील गुन्हे मागे घ्या, अशी मागणी कामठेकर यांनी केली होती. यावर राज्यपालांचे अवर सचिव जयराज चौधरी यांनी नांदेड पोलीस अधीक्षकांना ( Superintendent of Police ) पत्र पाठवत या प्रकरणाची चौकशी करून उचित कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.

हेही वाचा - Car Accident : ट्रॉलीवर कार धडकली; दोन पोलीस जागीच ठार, दोन गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.