ETV Bharat / state

नांदेडात स्वस्त धान्याच्या दुकानदाराला जबर मारहाण, १२ जणांविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - नांदेड रेशन दुकानावर मारहाण

कारतळा येथील काही जणांनी रेशन दुकानात घुसून दुकानदारावर हल्ला केला, तसेच ई-पॉज मशीन फोडून धान्य फेकून दिले. यावेळी जातीवाचक व अश्लील शिविगाळ केली.

scuffle-at-ration-shop-in-nanded
नांदेडात स्वस्त धान्याच्या दुकानदाराला जबर मारहाण, १२ जणांविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
author img

By

Published : Apr 26, 2020, 10:01 AM IST

नांदेड - कंधार तालुक्यातील कारतळा येथील स्वस्त धान्य दुकानातून लॉकडाऊनच्या काळात सरकारकडून आलेले मोफत धान्य वाटप सुरू आहे. यातच कारतळा येथील काही जणांनी या दुकानात घुसून दुकानदारावर हल्ला केला, तसेच ई-पॉज मशीन फोडून धान्य फेकून दिले. जातीवाचक व अश्लील शिविगाळ केली. या प्रकरणी दत्ता गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून १२ जणांविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंधार तालुक्यातील कारतळा येथे दत्ता लक्ष्मण गायकवाड यांच्याकडे स्वस्त धान्य दुकानाचा परवाना आहे. दत्ता गायकवाड हे स्वस्त धान्याचे लाभार्थीना वाटप करत असताना गावातील पंडित निवृत्ती कदम, अनिल विश्वांबर कदम, विश्वांबर मोतीराम कदम, नागेश पंडित कदम, तेजेराव विश्वांबर कदम, परमेश्वर मधुकर कदम, व्यंकटी धोंडिबा कानघुले, मधुकर लक्ष्मण कदम, नागेश आप्पाराव कदम, हणमंत निवृत्ती कदम, तुकाराम गोविंद कदम, अविनाश तुकाराम कदम यांनी दुकानावर अचानक हल्ला केला.

गायकवाड यांना जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच दुकानातील धान्य बाहेर फेकून दिले, इ-पॉज मशीनची तोडफोड केली. हा प्रकार पाहून गायकवाड यांच्या घरातील महिला सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही शिविगाळ करत त्यांनाही मारहाण केली. गुन्हा घडून दोन दिवस झाले तरी कंधार पोलीस प्रकरणाची दखल घेत नव्हते.अखेर दोन दिवसानंतर दत्ता गायकवाड यांच्या तक्रारीवरून कंधार पोलीस ठाण्यात वरील बारा जणांविरुद्ध कलम १४३,१४, १४८, १४९, ३२३, ३५४,४२, अनुसुचित जाती जमाती अत्याचार कायदा ३ (१)(१), ३ (१) (२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत यातील एकालाही अटक करण्यात आली नसल्याने संबंधीत कुटुंबात भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे पुढील तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.