नांदेड - येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली ( sanjay biyani murder case ) होती. याप्रकरणात आत्तापर्यंत ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 1 जूनला सुनावलेली 10 दिवसांची पोलीस कोठडी आज ( 10 जून ) संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तेव्हा न्यायलायने आरोपींना पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ( sanjay biyani murder case accused police custody ) आहे.
नांदेड शहरातील शारदानगर येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिलला गोळ्या झाडून हत्या केली होती. तब्बल 55 दिवस तपास केल्यानंतर पोलिसांनी या हत्येचा उलगडा करता आला. सहा राज्यांत तपास तसेच तीन देशांत पत्रव्यवहार करुन या तपासाची कडी जोडण्यात आली. सर्वत आधी सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर तीन आरोपींना अटक करुन पोलीस कोठडीत पाठवले. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता 9 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अद्यापही काही आरोपी पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती एसआयटीचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली आहे.
संजय बियाणींच्या भावास अटक - संजय बियाणी यांच्या हत्येनंतर बियाणी कुटुंबात आर्थिक वाद सुरू झाला आहे. बियाणी यांच्या पत्नी अनिता संजय बियाणी यांनी आपले दीर प्रवीण बालाजी प्रसाद बियाणी यांनी राज मॉल येथील फायनान्स ऑफिसमधून १ टीबी क्षमतेची संपूर्ण आर्थिक व्यवहाराची हार्डडिस्क चोरून नेल्याची तक्रार विमानतळ पोलीस ठाण्यात दिली होती. प्रवीण बियाणी तेव्हाच छातीत त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल झाले होते. उपचारानंतर विमानतळ पोलिसांनी गुरुवारी ( 9 जून ) सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रवीण बियाणी यांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं आहे.
हेही वाचा - Salman Khan Threat Letter : सौरभ महाकालने सलमान खान धमकी पत्राबाबत चौकशीत दिली 'ही' माहिती