ETV Bharat / state

नांदेडात डिझेलच्या नावाखाली भेसळयुक्त इंधनाची विक्री!

पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी शासनाकडे ३६ विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. यासाठी मोठा खर्च देखील येतो. मात्र तुटपुंज्या भांडवलावर शेड उभा करून चोरीच्या मार्गाने बायोडिझेल विक्री केली जात आहे. या अवैध धंद्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप पेट्रोल पंप चालकांनी केला आहे.

author img

By

Published : May 19, 2021, 3:58 PM IST

Updated : May 19, 2021, 5:21 PM IST

इंधनाची विक्री!
इंधनाची विक्री!

नांदेड - बायोडिझेलच्या नावाखाली भेसळयुक्त इंधनाची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघड झाला आहे. कसलीही परवानगी नसताना खुलेआम इंधनाची विक्री केली जात आहे. मात्र जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नांदेडात डिझेलच्या नावाखाली भेसळयुक्त इंधनाची विक्री!

भेसळयुक्त इंधनाची अवैध विक्री
नांदेड जिल्ह्यात डिझेल विक्रीच्या नावाखाली भेसळयुक्त इंधनाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. यासाठी प्रशासनाकडून कसलीही परवानगी घेण्यात आली नाही. दिवसाकाठी हजारो लिटर डिझेल सर्रासपणे विकले जात आहे. परवानगी नसताना नोझल मीटर बसवून ही विक्री केली जात आहे. पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी शासनाकडे ३६ विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. यासाठी मोठा खर्च देखील येतो. मात्र तुटपुंज्या भांडवलावर शेड उभा करून चोरीच्या मार्गाने बायोडिझेल विक्री केली जात आहे. या अवैध धंद्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप पेट्रोल पंप चालकांनी केला आहे.

नांदेड शहर, परिसरात भेसळयुक्त इंधनाची विक्री
नांदेड शहर आणि परिसरात बायोडिझेलच्या नावाखाली भेसळयुक्त डिझेलची विक्री केली जात आहे. मिळालेल्या माहिती नुसार इकबाल नगर, धनेगाव, जवाहर नगर, चंदसिंग कॉर्नर, सिडको एमआयडीसी, भोकर फाटा, याठिकाणी बायोडिझेलच्या नावाखाली भेसळयुक्त इंधनाची विक्री केली जात आहे. एकूण डिझेल विक्रीच्या ३० टक्के खप बायोडिझेलने व्यापला आहे.

बायोडिझेलच्या विक्रीने कोट्यवधीचा महसूल बुडाला
परवानगी नसतानाही विना परवाना बायोडिझेल विक्री करण्यात येत असल्याने शासनाचे वर्षाला कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे. तसेच बायोडिझेल व डिझेलच्या दरात भरपूर फरक आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल पंपाच्या डीलरला नुकसान सहन करावे लागत आहे. विना परवाना बायोडिझेल विक्री करणाऱ्या पंपांवर कारवाई करण्याची मागणी पेट्रोलपंप चालक चैतन्यबापू देशमुख यांनी केली आहे.

महसूल विभागाकडून कारवाईचा दिखावा?
नांदेड शहरात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त डिझेल विक्री केले जात आहे. याबाबद पेट्रोलपंप चालकांनी वेळोवेळी तक्रारी देखील केल्या आहेत. मात्र महसूल विभागाकडून कारवाईचा दिखावा केला जात आहे. अर्धवट कारवाई करत बायोडिझेल माफियांना मुभा दिल्याचे पुढे आले आहे. शहरातील आसणापूल भागात सुरू असलेल्या एका अवैध बायोडिझेल विक्रीवर तहसीलदार किरण अंबेकर यांनी कारवाई केली होती. या कारवाईत ३०० लिटरच्या डिझेलच्या पाच ते सहा टाक्या आणि नोझल जप्त करण्यात आले होते. मात्र २० हजार लिटरचा टॅंक आणि इतर साहित्य कारवाईतून वगळण्यात आले होते. आता तो पेट्रोलपंप पुन्हा सुरू करण्यात आला आहे. महसूल प्रशासन यावर कारवाई करणार का? असा प्रश्न पेट्रोलपंप चालकांनी केला आहे.

हेही वाचा - मुंबईजवळच्या समुद्रात अडकलेल्यांना वाचविण्याचा थरारक व्हिडिओ

Last Updated : May 19, 2021, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.