ETV Bharat / state

Sahastrakund Waterfall : सहस्रकुंड धबधबा प्रवाहित; तर ओसंडून वाहणारा शेख फरीदबाबा धबधब्यावर पर्यटकांची मांदियाळी - धबधब्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मागील आठवड्यात दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी धबधबे कोसळताना पाहायला मिळत आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधबाही प्रवाहित झाला आहे. अनेक पर्यटक सहस्रकुंडच्या धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी आले आहेत. त्यामुळे धबधब्यावर पर्यटकांची मांदियाळी पहायला मिळत आहे.

Sahastrakund Waterfall
सहस्रकुंड धबधबा प्रवाहित
author img

By

Published : Jul 31, 2023, 7:17 PM IST

Updated : Aug 1, 2023, 2:54 PM IST

धबधब्यावर पर्यटकांची मांदियाळी

नांदेड : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदीच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सलग आलेल्या दोन दिवसाच्या सुट्टीमुळे नांदेडच्या सहस्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. सहस्रकुंड धबधबा हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधब्यापैकी एक आहे. पावसाळ्यात अनेक निसर्गप्रेमी या धबधब्याला भेट देतात. हा धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात लाखो लोक येथे गर्दी करतात. हा धबधबा मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सीमेवर वसलेला आहे.

पर्यटकांची वाढली गर्दी : सततच्या पावसाने तीर्थक्षेत्र माहूर इथल्या वनराईने हिरवागार शालू परिधान केला आहे. माहूर शहराजवळच्या शेख फरीदबाबा दर्गाह इथला धबधबाही प्रवाहित झाला आहे. डोंगर दऱ्यातील पर्वतरांगांच्या कुशीतून नैसर्गिकरित्या हा धबधबा निर्माण झालेला आहे. शंभर फुटाच्या उंच दरीतून कोसळणारा हा धबधबा नयनरम्य असाच आहे. उंच डोंगरावरून कोसळणारे तुषार अंगावर झेलण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली आहे.

शेख फरीदबाबा धबधबा प्रवाहित : आई रेणुका मातेच्या मंदिरापासून हा धबधबा अवघ्या आठ किलोमिटर अंतरावर असल्याने, भाविक या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. अत्यंत दुर्गम भागात असलेल्या या धबधब्याच्या जागी सुविधा निर्माण केल्यास पावसाळी पर्यटनाचे हे एक चांगले ठिकाण होऊ शकते. मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या माहूरमध्ये देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांची पावले या धबधब्याकडे वळत आहेत. माहूर शहरापासून केवळ 12 किलोमीटर अंतरावर असलेला शेख फरीदबाबा दर्गा येथील धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे निसर्गरम्य परिसरातील धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

हेही वाचा -

  1. Melghat Waterfall : पांढऱ्या शुभ्र पाण्यासह मेळघाटातील धबधबे मोहरले; पर्यटकांची उसळली गर्दी
  2. Rautwadi Waterfall Radhanagari : राऊतवाडी धबधबा पर्यटकांसाठी पुन्हा खुला; पाहा ड्रोनद्वारे धबधब्याचे मनमोहक दृश्य
  3. Madhe Ghat Waterfall Video: पाहा, ड्रोनच्या साहाय्याने टिपलेली मढे घाटातील धबधब्याची मनमोहक दृश्ये

Last Updated : Aug 1, 2023, 2:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.