अर्धापूर नांदेड रस्त्यावर Ardhapur Nanded Road जांभरुन हद्दीत दुध डेअरीसमोर रस्त्यावर पेट्रोल पंपाचे मालक मोहम्मद मुस्तफा अली खान, रा. किल्ला रोड, नांदेड हे गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास पेट्रोल पंपातील जमा झालेली रक्कम १ लाख ७१ हजार ६० रुपये घेऊन घरी नांदेडकडे निघाले होते. याचवेळी पाठीमागून आलेल्या २ मोटरसायकल वरील अज्ञात ४ चोरट्यांपैकी एकाने गाडीला धक्का दिला. तर दुसऱ्याने पोटावर खंजरचा वार करण्याचा प्रयत्न केला असता मोहम्मद मुस्तफा अली खान यांनी बचावासाठी खंजरचा वार हाताने अडवला. यात त्यांच्या उजव्या हाताच्या दोन बोटांना जबर मार लागला आहे. या सर्व प्रकारात तर मोटारसायकलसह खाली पडले असता, चोरट्यांनी त्यांच्या जवळील १ लाख ७१ हजार ६० रुपये नगदी असलेली पैशांची बॅग आणि १७ हजार रुपयांचे २ मोबाईल असा एकूण मुद्देमाल १ लाख ८८ हजार ६० रुपये हिसकावून घेत तेथून पळ काढला.
याप्रकरणी मोहम्मद मुस्तफा अली खान यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात Ardhapur Police Station अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लुटमार प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव हे करीत आहेत. Robbed Petrol Pump Owner, Incident on Ardhapur Nanded Road
हेही वाचा बिहारमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात दरोडेखोरांनी केली गोळी झाडून दुकान मालकाची हत्या