ETV Bharat / state

Keshavrao Dhondge : शेकापचा बुलंद आवाज शांत! क्रांतिवीर भाई केशवराव धोंडगे यांचं निधन

मराठवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे यांचे आज रविवार (1 जानेवारी)रोजी दुपारी औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 102 वर्षांचे होते. (Keshavrao Dhondge) दीर्घकाळ आमदार खासदार राहिलेल्या धोंडगे यांनी आपली राजकीय कारकिर्द गाजवली. दरम्यान, त्यांच्या करारीपणामुळेच शेकापच्या माध्यामातून आपल्या कामाचा आणि राजकीय पातळीचा राज्याच्या राजकारणात वेगळाच दबदबा निर्माण केला होता.

Bhai Keshavrao Dhondge passed away
क्रांतिवीर भाई केशवराव धोंडगे यांच निधन
author img

By

Published : Jan 1, 2023, 5:58 PM IST

Updated : Jan 1, 2023, 7:53 PM IST

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातून आलेल्या केशवराव धोंडगे यांनी एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. ते सहा वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम असो की, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो मोठ-मोठ्या चळवळीत त्यांचा सहभाग होता. (Bhai Keshavrao Dhondge passed away) त्यांचा दांडगा लोकसंपर्क होता हे त्यांचे वेगळेपण होते. जनतेवरचं त्यांचे प्रेम आणि जनतेचा भाईंवरचा विश्वास याच बळावर ते गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहचले होते.

पोटतिडकीने प्रश्न मांडणारा नेता : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या एका छोट्याशा गावातून केशवराव धोंडगे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली होती. त्यांनी शेतकरी कामगार पक्षासोबत स्वत:ला जोडून घेतले. त्यांची साम्यवाद, मार्क्सवाद अशा दोन्ही विषयांवर अढळ निष्ठा होती. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने विधिमंडळ आणि संसदेत मांडले. 1975 साली आणीबाणीचा विरोध करताना 14 महिने कारावास भोगला. यात विशेष म्हणजे आणिबाणीनंतर (1977)मध्ये त्यांनी नांदेड लोकसभा जिंकली आणि दिल्लीत आपले वजन निर्माण केले. त्यानंतर (1995) मध्ये त्यांना पराभवही स्विकारावा लागला.

एक निर्भिड व्यक्तिमत्व - केशवराव धोंडगे हे पाचवेळा आमदार झाले होते, तर एकदा खासदार झाले होते. मराठवाड्यातल्या जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडत असल्याने त्यांना मराठवाड्याची मुलुख मैदान तोफ असे म्हटले जात होते. कंधार तालु्क्यातल्या गऊळ या गावात त्यांचा जन्म झाला होता. केशवराव धोंडगे हे प्रामुख्याने समस्या सहन करणाऱ्या, पिचलेल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी लढत होते. त्यांनी या वर्गाचे प्रश्न घेऊन अनेक आंदोलनांमध्येही सहभाग घेतला होता. त्यांनी या समाजातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेकदा आक्रमकपणे सरकारदरबारी प्रश्न उपस्थित केले आहेत. केशवराव, खासदार एकदा तर पाचवेळा आमदार झाले. या काळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. तसेच, ते कायम आंदोलनातून आणि आपल्या भाषणांमधून आपले काम करत असत. निर्भिड आणि स्वाभिमानी बाणा हे त्यांचे स्वभावविशेष होते. विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी ते सभागृहात उपस्थित राहात असत ही त्यांच्या कामातील शिस्तही सर्वत्र चर्चेचा विषय होती.

नुकताच गौरव सोहळा झाला - ऑगस्ट महिन्यात केशवराव धोंडगे यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या शताब्दीच्या वेळीच सरकार त्यांचा सत्कार करणार होते. पण करोनामुळे हा कार्यक्रम लांबणीवर पडला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शरद पवारांना दिली होती खास उपमा - केशवराव धोंडगे यांनी शरद पवार यांना बिनचिपळीचा नारद अशी उपमा दिली होती. एवढेच नाही तर वयाची शंभरी पार केल्यावरही ते म्हणायचे की मी शंभरीत असलो तरीही मी शेवटपर्यंत काम करत राहिल. तत्त्वाचे राजकारण करणारे मोजकेच आहेत पण रंग बदलणारे खूप. सरड्यासारखे रंग बदलणारे खूप असतात असे मत केशवराव धोंडगे यांनी त्यांच्या शंभरीच्या वेळी मत व्यक्त केले होते.

सभागृहात हशा पिकला - औरंगाबादला आकाशवाणी केंद्र व्हावे, उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, परभणीत कृषी विद्यापीठ व्हावे अशा अनेक मागण्या केशवराव धोंडगे यांनी लावून धरल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी विरोधकांना घाम फोडला होता. पण त्यांचे बोलणे मोठे विनोद निर्माण करणारे होते. महाराष्ट्राच्या भेटीला आलेल्या इंग्लंडच्या राणीला वस्त्रालंकार आणि नथ भेट देण्यात आली होती. त्यावरून धोंडगे यांनी केलेल्या टिप्पणीमुळे सभागृहात हशा पिकला होता.

Last Updated : Jan 1, 2023, 7:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.