ETV Bharat / state

जागतिक महिला दिनानिमित्त हदगाव मध्ये ११५ मीटर लांबीचा तिरंगी झेंडा करून शहीद जवानांना सलामी....! - रॅली

नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले.

११५ मीटर लांबीचा तिरंगा झेंडा
author img

By

Published : Mar 8, 2019, 11:59 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील हदगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या जवानांच्या वीरपत्नींना सलाम म्हणून ११५ मीटर लांबीचा तिरंगा झेंडा करण्यात आला. या रॅलीमध्ये शहरातील असंख्य महिलांनी तरुणींनी आपला सहभाग नोंदवला. 'भारत माता की जय' 'हिंदुस्तान जिंदाबाद' या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

आज ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी महिला शक्तीचे दर्शन हदगावकरांना घडवल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यात पतंजली योगपीठ समितीच्या सदस्या सपना तोष्णीवाल, जिजाऊ ब्रिगेडच्या वर्षा देशमुख, आर्य वैश्य महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभावती व्यवहारे, महिला दक्षता समिती नांदेडच्या सदस्य बशारत बेगम, डॉ. स्वप्ना कौटीकवार, डॉ. जयश्री पवार, डॉ. सविता मामीडवार, वैशाली मामीडवार, राधिका तुप्तेवार, सुवर्णा तोष्णीवाल, मंदाताई पत्तेवार, संध्याताई दमकोंडवार, दीप बलदवा, नीलिमा बलदवा, आरती बलदवा, निशा लाहोटी, वैशाली राऊळ यांच्यासह असंख्य महिलांनी सहभाग नोंदवला.

११५ मीटर लांबीचा तिरंगा झेंडा

शहरातील राखी चौकातून या सद्भावना रॅलीला सुरुवात करण्यात आली. पूर्ण गावातून ही रॅली फिरून राठी चौकात रॅलीचा समारोप झाला. या समारोपावेळी महिला दक्षता समितीच्या सदस्य बशारत बेगम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रॅलीत महिलांसह विद्यार्थिनींनीसुद्धा आपला सहभाग नोंदवला. शुक्रवारी हदगाव बाजाराचा दिवस असल्याने आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील महिलांनीसुद्धा यात आपला सहभाग नोंदवला. तर या सद्भावना रॅलीत नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश गायके, गोपनीय शाखेचे पप्पू चव्हाण यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Intro:जागतिक महिला दिनानिमित्त
हदगाव मध्ये ११५ मीटर लांबीचा तिरंगी झेंडा करून शहीद जवानांना सलामी....!Body:जागतिक महिला दिनानिमित्त
हदगाव मध्ये ११५ मीटर लांबीचा तिरंगी झेंडा करून शहीद जवानांना सलामी....!

नांदेड: जिल्ह्यातील हदगाव येथे दि.रोजी ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या वीर वधूंना महिलांचा सलाम म्हणून ११५ मीटर लांबीचा तिरंगी झेंडा करून सद्भावना रॅलीचे आयोजन येथील महिलांनी केले होते. या रॅलीमध्ये शहरातील असंख्य महिलांनी तरुणींनी आपला सहभाग नोंदवला. 'भारत माता की जय' 'हिंदुस्तान जिंदाबाद' या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
आज दि.८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी महिला शक्तीचे दर्शन हदगावकरांना घडविले असल्याचे बोलकी चित्र आज पाहावयास मिळाले. यात पतंजली योगपीठ समितीच्या सदस्या सपना तोष्णीवाल, जिजाऊ ब्रिगेडच्या वर्षा देशमुख, आर्य वैश्य महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभावती व्यवहारे, महिला दक्षता समिती नांदेड च्या सदस्य बशारत बेगम, डॉ. स्वप्ना कौटीकवार, डॉ. जयश्री पवार, डॉ .सविता मामीडवार, वैशाली मामीडवार, राधिका तुप्तेवार, सुवर्णा तोष्णीवाल, मंदाताई पत्तेवार, संध्याताई दमकोंडवार, दीप बलदवा, नीलिमा बलदवा, आरती बलदवा, निशा लाहोटी, वैशाली राऊळ यांच्यासह असंख्य महिलांनी सहभाग नोंदवला.
शहरातील राखी चौकातून या सद्भावना रॅलीला सुरुवात करण्यात आली. पूर्ण गावातून ही रॅली फिरून राठी चौकात या रॅलीचा समारोप झाला. या समारोपावेळी महिला दक्षता समितीच्या सदस्य बशारत बेगम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रॅलीत महिलांसह विद्यार्थिनींना पण आपला सहभाग नोंदवला होता. शुक्रवारी हदगाव बाजाराचा दिवस असल्याने आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील महिलांनी सुद्धा यात आपला सहभाग नोंदवला. तर या सद्भावना रॅलीत नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश गायके, गोपनीय शाखेचे पप्पू चव्हाण यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.