नांदेड - गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिबमध्ये बुधवारी (19 ऑगस्ट) श्री गुरु ग्रंथसाहेबांचा प्रथम स्थापना दिवस 'पहला प्रकाश' हा पर्व श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. गुरुद्वाराचे कार्यकारी जत्थेदार संतबाबा रामसिंघजी यांच्या मार्गदर्शनात सर्व धार्मीक विधी संपन्न झाल्या.
यावेळी मीत जत्थेदार संतबाबा ज्योतिंदरसिंघ, हेडग्रन्थी कश्मीरसिंघ, मौतग्रंथी गुरमीतसिंघ, विजेंदरसिंघ कपूर यांनी विविध सेवांचे संचालन केले. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास श्री आदि गुरुग्रंथसाहेबांच्या हुकुमनामाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर पाठ, किर्तन, आरती, कथा आणि इतर कार्यक्रम पार पडले. पहला प्रकाश पर्वाची अरदास उपरांत प्रसाद वितरण करण्यात आले. पहला प्रकाश पर्व निम्मित गुरुद्वाराच्या लंगरमध्ये लंगर प्रसाद कार्यक्रम झाले. सनानिमित्त भाविकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष भूपिंदरसिंघ मिनहास, उपाध्यक्ष गुरिंदरसिंघ बावा, सचिव रविंदरसिंघ बुंगई यांच्यासह गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य, अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. सुमारे 416 वर्षापूर्वी सन 1604 मध्ये पहिल्यांदाच श्री गुरु ग्रंथ साहेबांची स्थापना करण्यात आली होती. त्या घटनेच्या स्मरणार्थ पहला प्रकाश पर्व देशभर साजरा करण्यात येतो.
हेही वाचा - कौतुकास्पद : नांदेड जिल्हाधिकार्यांच्या पत्नीची शासकीय रुग्णालयात प्रसूती