नांदेड - पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ज्ञानेश्वर शिवदास वडजे असे त्या कर्मचाऱ्याचे नाव असून, पायाला होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.
मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी-
ज्ञानेश्वर वडजे हे नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत होते. स्नेहनगर पोलीस कॉलनीत ते कुटुंबियांसोबत रहात होते. सोमवारी रात्री जेवण झाल्यानंतर सिगारेट ओढण्याचा बहाना करून ते दुसऱ्या खोलीमध्ये गेले. मंगवाळी पहाटे ३ च्या सुमारास पत्नीने खोलीचे दार उघडले असता त्यांनी पंख्याला गळफास घेतलेला आढळून आले. त्यांच्या जवळ एक चिठ्ठी सापडली आहे. ज्यामध्येच मी माझ्या पायाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असून माझ्या दरम्यान माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नयेत अशा मजकूर लिहिला आहे. ज्ञानेश्वर यांना दोन अपत्ये आहेत. जे सध्या पुण्यात शिक्षण घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
सविस्तर वाचा- जळगावात पारा 10 अंशांवर; जिल्ह्यात हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद
सविस्तर वाचा- नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात सिझरचे प्रमाण अधिक