ETV Bharat / state

जुन्या भांडणाचा राग, तक्रारदाराला मागितली लाच; बीट जमादारच एसीबीच्या जाळ्यात

नांदेडमध्ये जुन्या भांडणाच्या रागातून तक्रारदाराला लाच मागितल्याचे प्रकरण बीट जमादाराला चांगलेच भोवले आहे.

कंधार पोलीस ठाणे
author img

By

Published : Jun 19, 2019, 7:45 AM IST

नांदेड - जिल्ह्यातील आंबुलगा येथील बीट जमादार देविदास वाघमारे यांना २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या पथकाने कंधार पोलीस ठाण्यात ही कारवाई केली. यामुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.

कंधार पोलीस ठाणे

टोकवाडीतील महावितरणच्या वीज खांबाची तोडफोड झाली होती. हा पोल तक्रारदाराच्या घराच्या दारात होता. त्यामुळे हा पोल तूच तोडलास, तुझ्या विरोधात गुन्हा दाखल करतो, अशी धमकी बीट जमादार देविदास वाघमारे देत होते. त्यानंतर याच तक्रारदाराच्या पत्नीचे गावातील एका महिलेसोबत भांडण झाले होते. भांडणाची तक्रार कंधार पोलीस ठाण्यात देण्यात आली. मात्र, तक्रारदाराला मदत करण्यासाठी जमादार वाघमारे २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करीत होते. याबाबतची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून वाघमारे यांना रंगेहाथ अटक केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संजय लाटकर, पोलीस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Intro:पाच हजाराची लाच घेताना जमादारास पकडले.....!
नांदेड : तालुक्यातील आंबुलगा येथील बीट जमादार देविदास वाघमारे यांना दोन हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या पथकाने कंधार पोलीस ठाण्यात रंगेहाथ हात पकडले.या कारवाईमुळे पोलीस त्यात एकच खळबळ उडाली आहे.Body:पाच हजाराची लाच घेताना जमादारास पकडले.....!
नांदेड : तालुक्यातील आंबुलगा येथील बीट जमादार देविदास वाघमारे यांना दोन हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या पथकाने कंधार पोलीस ठाण्यात रंगेहाथ हात पकडले.या कारवाईमुळे पोलीस त्यात एकच खळबळ उडाली आहे.

टोकवाडीतील महावितरणच्या वीज खांबाची तोडफोड केल्याचा प्रकार घडला होता. याबाबत कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबुलगाचे बीट जमादार देविदास भुजंगराव वाघमारे (४९) यांनी सदर पोल टोकवाडी ती तक्रारदाराच्या राहत्या घराच्या दारात होता, त्यालाच तूच हा पोल तोडलास तुझ्या विरोधात गुन्हा दाखल करतो अशी धमकी वाघमारे देत होता. तक्रारदाराच्या पत्नीचे गावातील एक महिलेसोबत भांडण झाले होते. भांडणाची तक्रार कंधार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती या तक्रारीमध्ये मदत करण्यासाठी २ हजारांच्या लाचेची मागणी वाघमारेने केली होती.
सदर प्रकरणातील तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड कडे तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली व लगेच सापळा रचून जमादार देविदास वाघमारे यांना दोन हजारांची लाच स्वीकारताना पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संजय लाटकर,पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी.एच.काकडे, पोकाँ अमरजीत सिंह चौधरी,सुरेश पांचाळ, चालक नरेंद्र बोडके यांनी केली. या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.