ETV Bharat / state

आईपासून दुरावले चार महिन्याचे बिबट्याचे पिल्लू; वनविभागाने घडवून आणली 'माय-लेकरा'ची भेट - बिबट्याचे पिल्लू

ज्वारीची कापणी सुरू असताना मजुरांना बिबट्याचे पिल्लू आढळून आले. त्यामुळे नागरिकांनी याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वनविभागाच्या पथकाने ट्रॅप कॅमेरे लावत मादी बिबट्याची व पिलाची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले.

Leopard
आई-पिलाची भेट
author img

By

Published : Apr 23, 2020, 10:14 AM IST

Updated : Apr 23, 2020, 12:13 PM IST

नांदेड - भोकर तालुक्यातील भोशी शिवारातील एका शेतात ज्वारीची कापणी चालू असताना बिबट्याचे पिल्लू आढळून आल्याने खळबळ उडाली. नागरिकांनी याबाबत माहिती दिल्यानंतर वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. वनविभागाच्या पथकाने अथक प्रयत्न करत बिबट्याचे पिल्लू आणि त्याच्या आईची भेट घडवून आणली. मादी बिबट्याने पिल्लाला सोबत घेत परिसातून धूम ठोकल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

आईपासून दुरावले चार महिन्याचे बिबट्याचे पिल्लू; वनविभागाने घडवून आणली 'माय-लेकरा'ची भेट

भोकर तालुक्यातील भोशी शिवारातील एका शेतात बिबट्याचे पिल्लू एकटेच असल्याचे काही शेतकऱ्यांनी पाहिले. याबाबत कल्पना दिल्यानंतर वनविभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. हा बछडा आईपासून दुरावला असता, तर त्याची वाचण्याची शक्यता कमी होती. तसेच पोटचा गोळा हरवल्यावर मादी बिबट मोठी आक्रमक झाली असती, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे वनविभागाच्या बचाव पथकाने या माय-लेकराची भेट घडवून आणण्याचे काम सुरू केले.

याच भागात याच बछड्याच्या आईच्या अर्थात मादी बिबटच्या अस्तित्वाच्या खुणा वनविभागाला निदर्शनास आल्या. त्यानंतर वनविभागाने हा सगळा परिसर निर्मनुष्य करत आधुनिक तंत्रज्ञान वापरत येथे ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला. वनविभागाने दूरवरून खडा पहारा देखील लावला होता, जेणेकरून बछड्याला अन्य कुणी त्रास देऊ नये. त्यानंतर मादी बिबटयाला सुरक्षेची जाणीव झाल्यानंतर रात्रीच्या अंधारात तिने येऊन आपल्या पिल्लाला उचलून नेले. दुर्मिळ समजले जाणारे हे बचावकार्य यशस्वी झाल्याने वनविभागाने समाधान व्यक्त केले.

बिबट्याच्या आईची व पिलाची भेट घडवून आणण्यासाठी नांदेड वनविभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गर्शनाखाली सहायक वनसंरक्षक डी. एस. पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. कवळे, मानद वन्यजीव रक्षक अतींद्र कट्टी, प्रसाद शिंदे, वनपाल गव्हाणे, वनरक्षक दासारवाड, सय्यद वसीम, शिंदे, वाठोरे, तेलंग व इतर वनकर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Last Updated : Apr 23, 2020, 12:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.