ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यातून पंतप्रधान केअर फंडला एक कोटी पाच लाखांची मदत - खासदार चिखलीकर - donation to pm casres from nanded

नांदेड जिल्ह्यातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान केअर फंडला १ कोटी पाच लाख रुपयांची रोख आर्थिक मदत देण्यात केल्याची माहिती नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

खा.चिखलीकर
खा.चिखलीकर
author img

By

Published : Jun 8, 2020, 7:55 PM IST

नांदेड - देशाची वाटचाल महासत्तेकडे होत असतानाच कोरोनासारखे जागतिक महामारीचे संकट ओढावले आहे. या संकटातही आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य वेळी ‘लॉकडाऊन' करत कोरोनाला रोखल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी टळली आहे. नांदेड जिल्ह्यातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान केअर फंडला १ कोटी पाच लाख रुपयांची रोख आर्थिक मदत पाठविण्याचे काम केले असल्याची माहिती नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

गेल्या एक वर्षात देशाने ऐतिहासिक निर्णय आणि विकासाच्या अभूतपूर्व गतीसह देश आगेकूच करत असतानाच कोरोनासारख्या जागतिक महासंकटाचा मुकाबलाही मोठ्या धैर्याने करत आहेत. हा काळ देशातील १३० कोटी जनतेसाठी संकल्पाचा काळ आहे. कोरोनासारख्या संकटावर मात करुन आपण सर्व देशवासी स्वत:चा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळही निश्चित करुन आगेकूच करत प्रगतीच्या मार्गावर धावू आणि विजयी होवू असा आत्मविश्वास खासदार चिखलीकर यांनी व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान खंबीरपणे कोरोनाशी लढा देत असताना त्यांच्या आवाहनानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व जनता या लढाईत खंबीरपणे सहभागी होवून कोरोनाला हरविण्याचा प्रयत्न करत आहे. लॉकडाऊनमुळे देशवासीयांसह जिल्ह्यातील जनतेलाही अनेक त्रास सहन करावे लागले आहेत. त्यामुळे, जगण्यातील गैरसोय ही आयुष्याचे संकट होऊ नये, हे सुध्दा आपल्याला ध्यानात ठेवायला हवे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक जनतेने धैर्य आणि चैतन्य आतापर्यंत जसे टिकविले तसेच यापुढेही टिकवायचे आहे. सोबतच, नांदेड जिल्ह्याचा खासदार या नात्याने कोरोना महामारीच्या संकटात सापडलेल्या गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी जीवाची पर्वा न करता धावून गेलो असल्याचा दावाही खासदार चिखलीकर यांनी यावेळी केला.

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पक्षप्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील हातावर पोट असणाऱ्या कुटुंबियांच्या मदतीला भाजप धावून जावून आधार बनला आहे. लॉकडाऊनच्या काळात समाजातील विविध घटकातील दीड लाख लोकांना अन्न-धान्याचे वाटप केले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कम्युनिटी किचनच्या माध्यमातून उपासपोटी असलेल्यांची भूक भागविण्याचे काम केले आहे. गरजूंना अन्न-धान्यासोबत भाजीपालाही मोफत देण्यात आले आहे. वैद्यकीय, पोलीस,महसूल कर्मचाऱ्यांना मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप भाजपच्यावतीने करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून वेळेवर मास्क व सॅनिटायझरचा पुरवठा होवू शकला नाही. परंतु, भाजपच्यावतीने सर्वप्रथम हा पुरवठा करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटकाळात जनतेच्या मदतीला ग्रांऊड झिरोवर जाऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदतीचे हात पुढे केले आहेत हे अभिमानाने सांगतो, असे खासदार चिखलीकर म्हणाले.

कोरोनाच्या महासंकटातून देशातील १३० कोटी जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार फंडातून १ कोटीचा निधी पंतप्रधान सहाय्यता निधीला देण्याची घोषणा करणारे चिखलीकर राज्यातील पहिले खासदार आहेत. जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने रोख १ कोटी पाच लाख रुपयांचे अर्थ सहाय्य पंतप्रधान केअर फंडला करण्यात आले आहे. तसेच खासदार चिखलीकर यांच्यासह जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने राज्यातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही 37 लाख रुपयांचा अर्थ पुरवठा करण्याचे काम जिल्हा भाजपने केले आहे. कोरोनामुक्तीसाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या नांदेड जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मस्के यांच्यासह सर्व वैद्यकीय-पोलीस कर्मचारी, अधिकारी, नर्सेस, आशा वर्कर, स्वंयसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांसह प्रत्येक कोरोना योध्दांचे जाहीर आभार त्यांनी व्यक्त केले.

जिल्हा प्रशानाने दिलेल्या निर्देशांचे पालन करुन आपण सर्व जण कोरोनामुक्त होऊन कोरोनाला हरविण्यासाठी वचनबध्द राहू असा संदेशही खासदार चिखलीकर यांनी जनतेला दिला आहे. या पत्रकार परिषदेस किनवटचे आमदार भिमराव केराम, मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड, नायगावचे आमदार राजेश पवार, माजी आमदार अविनाश घाटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजप जिल्हा महानगराध्यक्ष प्रविण साले, भाजप वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, भाजप जिल्हा सरचिटणीस गंगाधरराव जोशी, सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, भाजप जिल्हा प्रवक्ता प्रल्हाद उमाटे आदिंची उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.