नांदेड - शहरातील आरोग्य विभागाला प्रयोगशाळेकडून कोरोना संशयितांचे १८ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १७ अहवाल निगेटिव्ह असून आणखी एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, या रुग्णाचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १४ वर पोहोचली आहे.
शहरातील पिरबुऱ्हाण नगरातील ६२ वर्षीय व्यक्तीला लक्षणे दिसत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्याचा मृत्यू झाला. आज त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याला कोरोनाची लागण झाली होती, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३०२वर पोहोचली आहे, तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १४ झाली आहे. नांदेडमध्ये २२ एप्रिलला पहिला कोरोनाचा रुग्ण पिरबुऱ्हाण नगर येथेच आढळला होता. तसेच तोच रुग्ण जिल्ह्यातील पहिला कोरोनाचा बळी ठरला होता.