ETV Bharat / state

कुख्यात दहशतवादी रिंदाच्या वडील आणि भावाला अटक

Nanded Crime News : कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंघ रिंदाच्या (Harvinder Singh Rinda) वडील आणि भावाला खंडणी आणि मोक्काच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

Nanded Crime News
दहशतवादी हरविंदर सिंघ रिंदाच्या वडील आणि भावाला अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 10:31 PM IST

Updated : Nov 29, 2023, 10:51 PM IST

माहिती देताना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड Nanded Crime News : कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाच्या (Harvinder Singh Rinda) वडील आणि भावाला आज नांदेड पोलिसांनी अटक केली. 22 सप्टेंबर 2022 रोजी एकाला रिंदाच्या नावाने खंडणी मागण्यात आली होती. पण त्या व्यक्तीने भीतीपोटी तक्रार दिली नव्हती. त्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी पोलीस दलाकडून फिर्याद देऊन काही आरोपींना अटक केली होती. त्या प्रकरणाच्या तपासात कुख्यात दहशदवादी रिंदाचे वडील चरणसिंग संधू आणि भाऊ सरबज्योत सिंग संधू हे देखील सहभागी असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यावरुन आज नांदेड पोलिसानी दोघांना अटक केली. त्यांना कलम 384, 385, 387 आणि मोका ॲक्टची कलमे लावण्यात आली आहेत. आज दुपारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

4 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी : नांदेड-टेरर फंडींग प्रकरणात रिंदाच्या मित्राला 7 जुलै रोजी अटक केल्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाच्या वडील आणि भावाला अटक करण्यात आली. आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही. मराठे यांनी या दोघांना 4 डिसेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

रिंदाचे नाव वापरून खंडणी वसुली : कुख्यात अतिरेकी हरविंदर सिंग उर्फ रिंदा संधू याने 100 कोटी रुपयांची वसुली केली होती. ते पैसे कसे वापरणार याचं विस्तृत विवरण एका टी.व्ही. मुलाखती केलं होतं. या मुलाखतीपुर्वी रिंदा मरण पावला अशा अफवा उठल्या होत्या. त्यानंतरच रिंदाने ती मुलाखत दिली होती. या मुलखतीनंतर नांदेडमध्ये अनेक जणांनी रिंदाचे नाव वापरून खंडणी वसूल केल्याचे अनेक गुन्हे घडले. काही गडगंज श्रीमंतांनी रिंदाला खंडण्या पण करोडो रुपयांच्या संख्येत दिलेल्या आहेत. त्यानंतर त्या गडगंजांनी स्वतःसाठी आम्हाला रिंदापासून धोका आहे म्हणून पोलीस सुरक्षा रक्षक मिळवली होती.

असा झाला खंडणीचा व्यवहार : स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन, गुन्हा क्रमांक 119/2023 वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्याकडे देण्यात आला. 1 कोटी रुपयांची खंडणी रिंदाने मागितली. त्यानंतर खंडणी ज्या व्यक्तीला मागितली त्याच्या नातलगाने भरतकुमार धरमदास पोपटाणी (40) या रिंदाच्या लहानपणीच्या मित्राशी संपर्क साधला. नंतर ती 1 कोटीची खंडणी 40 लाखांपर्यंत घसरली आणि खंडणीचा व्यवहार पूर्ण झाला होता.

भरत पोपटाणीला अटक : अत्यंत कासवगतीने परंतु कायद्याच्या कक्षेत या गुन्ह्याचा तपास सुरू होता. 5 जुलै रोजी भरत पोपटाणीला अटक झाली. भरतकुमार पोपटाणी हा प्रख्यात बांधकाम व्यावसायिक आहे. संजय बियाणी यांच्या हत्येदरम्यान सुध्दा पोलीसांच्या ताब्यात होता. परंतु त्याला नंतर सोडून देण्यात आले होते. या प्रकरणातील खंडणी देणाऱ्याचे नाव पोलिसांनी आजही गुप्त ठेवले आहे.

हेही वाचा -

  1. Nanded Police : हातावेगळा झालेला पंजा पोलिसांच्या विनंतीनंतर डॉक्टरांनी जोडला; आरोपींची काढली धिंड
  2. Nanded Crime News: गीट्टी क्रेशर मालकाकडे 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना अटक; सापळा लावून आरोपी जेरबंद
  3. नांदेडात 17 वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह! 12 तासाच्या आत मारेकऱ्यास अटक

Last Updated : Nov 29, 2023, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.