ETV Bharat / state

कोरोनावर कोणीही राजकारण करू नये... अशोक चव्हाणांचा टिकाकारांना सल्ला - अशोक चव्हाण नांदेड बातमी

नांदेडच्या हुजूर साहिब गुरुद्वारा येथे दर्शनासाठी पंजाब व हरियाणा येथून आलेले सुमारे साडेतीन हजार भाविक नांदेडमध्ये अडकले होते. राज्य सरकार पंजाब सरकार व केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीने या साडेतीन हजार भाविकांना पंजाबमध्ये पोहचविले गेले होते.

no-one-should-do-politics-on-corona-says-ashok-chavan

author img

By

Published : May 1, 2020, 12:17 PM IST

नांदेड- नांदेडमधून पंजाबात परत गेलेल्या भाविकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नांदेडच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे. याबर बोलताना पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, देशामध्ये कोणी चीन वरुन तर कोणी दुबईवरुन आले आहे. त्यासाठी कोणाला जबाबदार धरावे? असा प्रतिसवाल करीत चव्हाण यांनी यात कोणीही राजकारण करू नये, असा सल्ला दिला आहे.

कोरोनावर कोणीही राजकारण करू नये...

हेही वाचा- मुंबईत कोरोनाचे आज 417 नवे रुग्ण; 20 जणांचा मृत्यू तर एकूण रुग्ण संख्या 6874 वर

नांदेडच्या हुजूर साहिब गुरुद्वारा येथे दर्शनासाठी पंजाब व हरियाणा येथून आलेले सुमारे साडेतीन हजार भाविक नांदेडमध्ये अडकले होते. राज्य सरकार पंजाब सरकार व केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीने या साडेतीन हजार भाविकांना पंजाबमध्ये पोहचविले गेले होते. २५, एप्रिल २६ एप्रिल आणि २७ एप्रिल या तीन टप्प्यात या भाविकांना पंजाबमध्ये सोडले गेले. यातील जवळपास १०० भाविकांना कोरोनाची लागण लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे नांदेडच्या कार्यपद्धतीवर काही जण टीका करत आहेत. मात्र, हा राजकारण करण्याचा विषय नाही. आरोप प्रत्यारोपांच्या विषय असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

नांदेडमध्ये सध्या तरी कोरोना नियंत्रणात आहे. स्थानिक संशयित लोकांची चाचणी केली जात आहे. मात्र, या स्थानिकांचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.