ETV Bharat / state

नांदेडमध्ये एकाही कोरोनाबाधिताची नोंद नाही; 180 जण कोरोनामुक्त - नांदेड कोरोना रुग्ण

286पैकी आतापर्यंत 180 कोरोनाबाधित व्यक्ती बऱ्या झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 93 बाधित व्यक्तींवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली औषधोपचार चालू आहेत.

Government hospital nanded
Government hospital nanded
author img

By

Published : Jun 17, 2020, 7:37 PM IST

नांदेड- जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित आढळला नाही. सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेले 13 अहवाल निगेटिव्ह आहेत. एकही कोरोनाबाधित न आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 286वर स्थिरावली आहे.

आतापर्यंत 286पैकी 180 बाधित व्यक्ती बऱ्या झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 93 बाधित व्यक्तींवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली औषधोपचार चालू आहेत. यामध्ये 52 वर्षाची एक महिला तसेच 52 आणि 54 वर्षांच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 13 झाली आहे.

जिल्ह्यात 93 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 16, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 59, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 13 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 5 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. आज 236 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळपर्यंत प्राप्त होईल.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे; (17 जून सांयकाळी पाच वाजेपर्यंत)

सर्वेक्षण- 1 लाख 45 हजार 568,

घेतलेले स्वॅब- 5 हजार 457

निगेटिव्ह स्वॅब- 4 हजार 643

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- निरंक

एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 286

स्वॅब तपासणी अनिर्णित संख्या- 220

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 86

मृत्यू संख्या -13

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 180

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 93

स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची- 236

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.