ETV Bharat / state

नांदेडमध्ये कोरोनाचा नववा बळी; रुग्णसंख्या 192 वर..!

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 192 झाली. 131 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 52 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

author img

By

Published : Jun 8, 2020, 12:45 PM IST

Corona's ninth patient dies in Nanded;
नांदेडमध्ये कोरोनाचा नववा बळी

नांदेड - शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या एका महिलेचा आज(सोमवारी) मृत्यू झाला आहे. या मृत्यूसोबत जिल्ह्यातील मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे.

नांदेड शहरात रविवारी दोन रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये गुलजार बाग येथे राहणार्‍या एका 55 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले होते. या महिलेची प्रकृती रुग्णालयात आणण्यापूर्वीच गंभीर होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरब असताना सोमवार(8 जून) सकाळी तिचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 192 झाली. 131 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 52 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

नांदेड - शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या एका महिलेचा आज(सोमवारी) मृत्यू झाला आहे. या मृत्यूसोबत जिल्ह्यातील मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे.

नांदेड शहरात रविवारी दोन रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये गुलजार बाग येथे राहणार्‍या एका 55 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले होते. या महिलेची प्रकृती रुग्णालयात आणण्यापूर्वीच गंभीर होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरब असताना सोमवार(8 जून) सकाळी तिचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 192 झाली. 131 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 52 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.