नांदेड: एनआयएने आज नांदेडमध्ये छापेमारी ( NIA raids in Nanded ) केली. यानंतर एनआयएने शहरातील तीन जणांना ताब्यात घेतले ( NIA detained Three in Nanded ) होते. आज पहाटे तिघांना ताब्यात घेऊन त्यांची बारा तास चौकशी ( NIA Interrogate Three Suspected ) करण्यात आली. चौकशीनंतर तिघांचीही सुटका ( Three released after NIA probe in Nanded ) करण्यात आली.
विवादीत व्हॉट्स अॅप ग्रुपवर एनआयएची नजर- एका व्हॉट्स अॅप ग्रुपवर नांदेड येथील एका युवकाने चॅटिंग केली होती. त्याने काही अरबी वाक्याचा अर्थ उर्दूमध्ये सांगितले होता. त्याच ग्रुपमध्ये काही संशयित होते. त्यावरुन नांदेडच्या युवकांची चौकशी करण्यात आली. चौकशीत काही निष्पन्न न झाल्याने त्या तिघांची सुटका करण्यात आली.
हेही वाचा- संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईनंतर बंगल्यासमोर जमलेल्या शिवसैनिकांना हात दाखवून केले आश्वस्त