ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात रविवारी 72 कोरोना बाधितांची भर, एकाचा मृत्यू - नांदेड कोरोना अपडेट्स बातमी

आजरोजी संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 72 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून 21 जणांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, भोकर येथील 50 वर्षाच्या एका महिलेचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कोरोना बाधितांची भर
कोरोना बाधितांची भर
author img

By

Published : Jul 26, 2020, 10:07 PM IST

नांदेड : जिल्ह्यात आज(रविवार) 26 जुलैरोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 72 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. तर, 21 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकूण 243 अहवालांपैकी 161 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे, जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 1 हजार 324 एवढी झाली असून यातील 693 एवढे बाधित बरे झाले आहेत. 562 बाधितांवर औषधोपचार सुरू असून त्यातील 10 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 4 महिला व 6 पुरुषांचा समावेश आहे.

आज भोकर येथील 50 वर्षाच्या एका महिलेचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या 57 एवढी झाली आहे. तर, आतापर्यंत एकूण 693 बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात 562 बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 104, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 213, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 27, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 8, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 3, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 77, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 32, उमरी कोविड केअर सेंटर 10, लोहा कोविड केअर सेंटर येथे 10, हदगाव कोविड केअर सेंटर 9, भोकर कोविड केअर सेंटर 1, कंधार कोविड केअर सेंटर येथे 8, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 8, खासगी रुग्णालयात 45 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 5 बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे 1 बाधित तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भीत झाले आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची माहिती

सर्वेक्षण - 1 लाख 48 हजार 522,
घेतलेले स्वॅब - 12 हजार 281,
निगेटिव्ह स्वॅब - 9 हजार 814,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या - 72,
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 1 हजार 324,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 8,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - 1,
मृत्यूसंख्या - 57,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 693,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - 562,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - 309.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.