ETV Bharat / state

नांदेडमध्ये 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या 558 वर - नांदेड कोरोना अपडेट

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 358 व्यक्ती कोरोनातून बरे झाले असून, शुक्रवारी कंधार इमामवाडी येथील 52 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच शुक्रवारी (10 जुलै) 266 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यांचा अहवाल आज सायंकाळीपर्यंत प्राप्त होईल.

nanded corona update
नांदेडमध्ये एकाचा मृत्यू तर 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या 558 वर
author img

By

Published : Jul 11, 2020, 1:03 PM IST

नांदेड - जिल्ह्यामध्ये शुक्रवारी प्राप्त झालेल्या एकूण 188 अहवालांपैकी 132 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 34 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे‍ जिल्ह्यातील कोरोनाबाधित व्यक्तींची एकूण संख्या 558 एवढी झाली आहे. 5 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 358 व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत. शुक्रवारी रोजी कंधार इमामवाडी येथील 52 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 1 कोरोनाबाधित व्यक्ती, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 2, मुखेड कोविड केअर सेंटर येथील 1, औरंगाबाद येथे संदर्भित झालेल्या 1 व्यक्तीचा समावेश आहे. इमामवाडी येथील मृत्यू झालेल्या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या कोरोनाबाधितास उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते. त्यामुळे आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत रुग्णांची संख्या 25 एवढी झाली आहे.

नवीन कोरोनाबाधितांमध्ये नांदेड वाघाळा येथील 41 वर्षाचा 1 पुरुष, गोकुळनगर येथील 47 वर्षाचा 1 पुरुष, नांदेड मोमिनपुरा येथील 55 वर्षाची 1 महिला, नांदेड हबिबियानगर येथील 70 वर्षाचा 1 पुरुष, दशमेश नगर बाफना येथील 57 वर्षाची 1 महिला, देगलूरनाका येथील 48 वर्षाचा 1 पुरुष, गणेशनगर नांदेड येथील 14 वर्षाची 1 महिला, विजयनगर येथील 68 वर्षाची 1 महिला, वजिराबाद येथील 54 वर्षाचा 1 पुरुष, रविनगर येथील 45 वर्षाचा 1 पुरुष, धुमाळवाडी येथील 45 वर्षाची 1 महिला, 25 वर्षाचा 1 पुरुष, बिलोली गांधीनगर येथील 16 वर्षाचा 1 मुलगा, बिलोली तालुक्यातील फारुकी येथील 28 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड तालुक्यातील तबलीन गल्ली येथील 11 बाधितांमध्ये 3 वर्षाचा बालक, 16, 45, 43, 27 वर्षाचे 4 पुरुष, 9, 13 वर्षाच्या 2 मुली, व 35, 43, 28, 30 वर्षाच्या 4 महिलेचा समावेश आहे.

18 कोरोनाबाधित व्यक्तींचा अहवाल गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झाला आहे. तसेच उर्वरीत 16 कोरोनाबाधित व्यक्तींचा अहवाल शुक्रवारी दुपारी प्राप्त झाला आहे. शुक्रवारी 175 कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर औषधोपचार सुरू असून, त्यातील 18 कोरोनाबाधितांची त्यात 10 महिला आणि 8 पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

नांदेड जिल्ह्यात एकूण 558 बाधितांपैकी 25 बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर 358 बाधित व्यक्ती बरे झाले आहेत. उर्वरीत 175 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 50, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 58, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 28, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 7, जिल्हा रुग्णालय येथे 5, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 11, हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे 2, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1, किनवट कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात 4 बाधित व्यक्ती उपचार घेत आहेत. तसेच 6 कोरोनाबाधित रुग्ण औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती -

सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 592,
घेतलेले स्वॅब- 7 हजार 860,
निगेटिव्ह स्वॅब- 6 हजार 497,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 34,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 558,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 24,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 6,
मृत्यू संख्या- 25,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 358,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 175,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 266 एवढी संख्या आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.