ETV Bharat / state

वऱ्हाड निघाले पुरातून; लग्नासाठी पैनगंगेतून 7 KM नवरदेवचा प्रवास; अखेर मुहुर्तावर केले थाटात लग्न

हदगाव तालुक्यातील करोडी येथील शहाजी राकडे याचे नियोजित लग्न आज शुक्रवार उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली येथे झाले. तत्पूर्वी आजच्या टिळा, हळदीच्या कार्यक्रमासाठी नवरदेव थर्माकॉलच्या होडीवरून सासुरवाडीत पोहचला ( Navradeva traveled by boat for reached wedding ) होता. या गोष्टीची पूर्ण पंचकुशीत चर्चा सुरु आहे.

Navradeva traveled by boat for reached wedding
वऱ्हाड निघाले पुरातून.. अखेर मुहुर्तावर केले थाटात लग्न
author img

By

Published : Jul 15, 2022, 6:25 PM IST

नांदेड - नांदेड जिल्ह्यात पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. परिणामी अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटलेला असताना वाहतूकही बंद आहे. अशातच हदगाव तालुक्यातील करोडी येथील शहाजी राकडे याचे नियोजित लग्न आज शुक्रवार उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली येथे झाले. तत्पूर्वी आजच्या टिळा, हळदीच्या कार्यक्रमासाठी नवरदेव थर्माकॉलच्या होडीवरून सासुरवाडीत पोहचला ( Navradeva traveled by boat for reached wedding ) होता. या गोष्टीची पूर्ण पंचकुशीत चर्चा सुरु आहे.

वऱ्हाड निघाले पुरातून.. अखेर मुहुर्तावर केले थाटात लग्न

लग्नासाठी नवरदेवाचा जीवघेणा प्रवास - लग्नासाठी पुरातून जीवघेणा प्रवास करणाऱ्या युवकाच आज थाटात लग्न पार पडले. नांदेड जिल्ह्यात संततधार पावसामुळे पूर आला. नांदेड मधील हदगाव तालुक्यात पैनगंगा, कयाधु नदीला पूर आला. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले. हदगाव मधील करोडी येथील युवक शहाजी राकडे याचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील उमेरखेड तालुक्यातील चिंचोळी येथील गायत्री गोंडाडे या युवतीशी जमला होता.

अखेर झाले लग्न - 14 जुलै रोजी हळद आणि टिळयाचा कार्यक्रम आणि 15 जुलै रोजी लग्न ठरले. पण मागील अनेक दिवसांपासून नांदेडमध्ये पाऊस सुरू होता. अनेक मार्ग बंद झाले. हदगाव -उमरखेड हा मार्ग बंद झाला. पण कोणत्याही परिस्थितीत लग्न करायचे असे ठरवलेल्या नवरदेवाने पुराच्या पाण्यातून वरात काढली. करोडी ते चिंचोली असा सात किलोमीटरचा प्रवास थर्माकोलचच्या हुड्यावर करून हा पठ्ठा लग्नस्थळी पोहचला. टीळा आणि हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाला. आणि त्याच लग्न देखील झाले. पुरातून लग्नासाठी जातांनाचा त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.

नवरदेवाची शिस्त : लग्नाच्या वेळी कार्यक्रमात बिभत्स नृत्य करून उशीर करणाऱ्या वर मुलांना सामान्य कुटुंबातील वराची ही चपराक आहे. करोडी ता. हदगाव येथील शहाजी माधव राकडे आठवी शिकलेला तरुण आहे. परिवारात आई-वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. बहिणींची लग्न झालीत. घरी शेती वगैरे काही नाही. मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालतो. त्याचा विवाह नात्यातीलच संगम चिंचोली ता. उमरखेड येथील वधू गायत्री बालाजी गोंडाडे या मुलीशी एक महिन्यापूर्वी जुळून आला होता.

पूरपरिस्थितीमुळे विवाहात अडचणी : ठरल्याप्रमाणे दि. १४ गुरुवारी सकाळी वधुकडे टिळा कुंकु पानवाट्याचा रात्री हळदीचा कार्यक्रम होता. सततच्या पावसामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती असताना संगमचिंचोली हे पैनगंगानदी व कयाधू नदीचे संगमस्थान आहे. त्यामुळे येथे पूर परस्थिती विचारापलीकडची असते, असे असताना ठरल्याप्रमाणे नियोजीत वेळी टिळा, कुंकु पानवाट्याच्या कार्यक्रमात पोहचायचे कसे असा प्रश्न असताना वराकडील मंडळींना पडला होता.

हेही वाचा - Unique Marriage in Heavy Rain : नवरदेवाची पुरात कसरत... थर्माकोलच्या मदतीने 7 कि.मी. नदीमार्गाने जलप्रवास... अखेर पोहोचला नवरीकडे!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.