ETV Bharat / state

नांदेडकरांच्या आशा पल्लवित; अशोक चव्हाणांच्या रुपाने पुन्हा मंत्रीपद मिळण्याच्या चर्चेला उधाण - काँग्रेस

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी मिळणार का याबद्दल नांदेडकरांमध्ये उत्सुकता आहे. पाच वर्षांपासून कोणत्याही सत्तेविना त्यांना राहावे लागले होते. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचे प्रदेशाध्यक्षपदही गेले. आता नव्या सरकारमध्ये त्यांच्यावर कोणती जबाबदारी दिली जाते हे पाहणे महत्वाचे आहे.

nanded
अशोक चव्हाण
author img

By

Published : Nov 27, 2019, 5:20 PM IST

नांदेड - राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच मित्र पक्षांचे सरकार स्थापन होत आहे. मागचे पाच वर्षे विरोधी बाकावर बसलेल्या अशोक चव्हाणांच्या आणि नांदेडकरांच्या आशा यामुळे पल्लवीत झाल्या आहेत. अशोक चव्हाण यांच्याकडे कोणती जबाबदारी येणार याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

काँग्रेस पक्षाकडे उपमुखमंत्रीपद येईल असे सांगितले जात आहे. शिवाय महसूल आणि अन्य महत्वाची खाती येणार आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांना महसूल खाते मिळणार का याविषयी चर्चा सुरू आहे. पाच वर्षे सत्तेविना राहिलेल्या चव्हाण समर्थकांकडून मंत्रीपदाची अपेक्षा केली जात आहे. पण, या प्रश्नाचे उत्तर उद्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यावरच मिळेल.

हेही वाचा - आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री किती? आज होणार निर्णय - बाळासाहेब थोरात

नांदेड जिल्ह्यात नऊ पैकी काँग्रेसला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (भोकर), माधवराव पाटील जवळगावकर (हदगाव), रावसाहेब अंतापूरकर (देगलूर) आणि मोहन हंबर्डे (नांदेड दक्षिण) अशा चार जागा मिळाल्या आहेत. भाजपला डॉ. तुषार राठोड ( मुखेड), भीमराव केराम (किनवट) आणि राजेश पवार (नायगाव) अशा तीन तर शिवसेनेला बालाजी कल्याणकर (नांदेड – उत्तर) व शेकापला श्यामसुंदर शिंदे (लोहा) अशा प्रत्येकी एक जागा मिळाल्या आहेत.

हेही वाचा - तुम्ही बघत रहा 'बुलेट ट्रेन'पेक्षा वेगाने ३ चाकांची रिक्षा धावेल; सतेज पाटलांचा फडणवीसांना टोला

अशोक चव्हाण दोनदा मुख्यमंत्री राहिले असून त्यांना सर्वात जास्त अनुभव आहे. बाळासाहेब थोरात यांची गटनेतेपदी निवड झाली असून त्यांच्याकडे सध्या प्रदेशाध्यक्षपद आहे. आता उपमुख्यमंत्री म्हणून थोरात, अशोक चव्हाण की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यापैकी कोणाची निवड होणार? यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Intro:राज्याच्या राजकारणात अशोकराव पुन्हा सक्रीय...; नेमकी कोणती जबाबदारी जिल्ह्याला उत्सुकता...!

नांदेड : राज्यात शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच मित्र पक्षांचे सरकार स्थापन होत आहे. आता पुन्हा राजकीय संदर्भ बदलल्यामुळे नांदेडकरांच्या देखील अपेक्षा वाढल्या आहेत. नवीन सरकारमध्ये नांदेडला काय मिळणार? अशोक चव्हाण यांच्याकडे कोणती जबाबदारी येणार? खासदार असतानाही चव्हाण यांनी पक्षाच प्रदेशाध्यक्ष व्यवस्थितरित्या सांभाळल होते, त्यामुळे आता चव्हाण पुन्हा राज्याच्या राजकारणात आपली छाप सोडतील अशी आशा नांदेडकरांना आहे.Body:राज्याच्या राजकारणात अशोकराव पुन्हा सक्रीय...; नेमकी कोणती जबाबदारी जिल्ह्याला उत्सुकता...!

नांदेड : राज्यात शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच मित्र पक्षांचे सरकार स्थापन होत आहे. आता पुन्हा राजकीय संदर्भ बदलल्यामुळे नांदेडकरांच्या देखील अपेक्षा वाढल्या आहेत. नवीन सरकारमध्ये नांदेडला काय मिळणार? अशोक चव्हाण यांच्याकडे कोणती जबाबदारी येणार? खासदार असतानाही चव्हाण यांनी पक्षाच प्रदेशाध्यक्ष व्यवस्थितरित्या सांभाळल होते, त्यामुळे आता चव्हाण पुन्हा राज्याच्या राजकारणात आपली छाप सोडतील अशी आशा नांदेडकरांना आहे.

काँग्रेस पक्षाकडे उप मुखमंत्री पद येणार आहे . शिवाय महसूल आणि अन्य महत्वाची खाती येणार आहेत . त्यामुळे अशोक चव्हाण यांना महसूल खाते मिळणार का याविषयी चर्चा सुरु आहे. गेल्या महिनाभरापासून राज्यात राजकीय घडामोडी घडत असून दरदिवशी वेगवेगळे संदर्भ आणि प्रयोग पुढे येत गेले. त्यातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि तीन दिवसातच त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार हे स्पष्ट झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार आणि ते गुरुवारी शपथ घेणार, हे जाहीर झाले.

या सगळ्या घडामोडींकडे नांदेडकरही लक्ष ठेऊन असून आता नांदेडला काय मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या पाच वर्षांत भाजप – शिवसेनेचे सरकार होते. मात्र, नांदेड जिल्ह्यात त्या वेळी नऊपैकी चार शिवसेना व एक भाजपचा आमदार असतानादेखील एकालाही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. आता शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये नांदेडला काय मिळणार? या बाबत अपेक्षा वाढल्या असून कुणाला संधी मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात नऊ पैकी कॉँग्रेसला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (भोकर), माधवराव पाटील जवळगावकर (हदगाव), रावसाहेब अंतापूरकर (देगलूर) आणि मोहन हंबर्डे (नांदेड दक्षिण) अशा चार जागा मिळाल्या आहेत. भाजपला डॉ. तुषार राठोड ( मुखेड), भीमराव केराम (किनवट) आणि राजेश पवार (नायगाव) अशा तीन तर शिवसेनेला बालाजी कल्याणकर (नांदेड – उत्तर) व शेकापला श्यामसुंदर शिंदे (लोहा) अशा प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. आता कॉँग्रेसला मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सर्वात जास्त संधी आहे.
अशोक चव्हाण दोनदा मुख्यमंत्री राहिले असून त्यांना सर्वात जास्त अनुभव आहे. बाळासाहेब थोरात यांची गटनेतेपदी निवड झाली असून त्यांच्याकडे सध्या प्रदेशाध्यक्षपद आहे. आता उपमुख्यमंत्री म्हणून थोरात, अशोक चव्हाण की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यापैकी कोणाची निवड होणार? यावर पुढील सर्व काही अवलंबून आहे.

तीन पैकी एका पदाची शक्यता!

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तीनपैकी एक पद मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष किंवा विधानसभा अध्यक्ष या पैकी एक पद अशोक चव्हाण यांना मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. कॉँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, महसूल अशी पदे येण्याची शक्यता आहे. आता कॉँग्रेसचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात? याकडे नांदेडकरांसह कॉँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.