ETV Bharat / state

नांदेड विद्यापीठ घेणार अंतिम वर्षाच्या परीक्षा, जुलै महिन्यात सुरुवात - नांदेड विद्यापीठ परीक्षा वेळापत्रक

पदवी आणि पदव्युत्तर अंतिम सत्राची परीक्षा विद्यापीठाच्यावतीने १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान घेतली जाणार आहे. जे विद्यार्थी पदवीच्या अंतिम सत्राची परीक्षा देणार आहेत, त्यांच्या बॅकलॉगची परीक्षा ८ जुलै ते १० जुलै दरम्यान संबंधित महाविद्यालयाच्या पातळीवर घेण्यात येणार आहे. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या अंतिम सत्राची परीक्षा देता येईल.

नांदेड विद्यापीठ घेणार अंतिम सत्राच्या परीक्षा

author img

By

Published : May 21, 2020, 11:00 AM IST

Updated : May 21, 2020, 11:18 AM IST

नांदेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व विद्यापीठांच्या विविध परीक्षा रखडल्या होत्या. ज्या घेण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. या परीक्षा कशा पद्धतीने घेण्यात याव्यात यासाठी शासनाने एक अभ्यास समिती नेमली होती. त्या समितीने सर्व विद्यापीठांना काही मार्गदर्शक शिफारशी सुचवल्या आहेत. त्यानुसार आता पदवीच्या अंतिम सत्राच्या परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहेत.

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने या परीक्षा घेण्याबाबत एक परिपत्रक काढले आहे. या विद्यापीठांतर्गत संलग्नित असणाऱ्या नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांसह विद्यापीठाच्या संचालक आणि उपकेंद्र संचालकांना या मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. ही सर्व महाविद्यालये शासनाने आखून दिलेल्या खबरदारीसोबत सर्व परीक्षा घेणार आहेत. याबाबतची माहिती विद्यापीठाच्या परभणी उपकेंद्राचे संचालक वसंत भोसले यांनी माध्यमांना दिली.

नांदेड विद्यापीठ घेणार अंतिम वर्षाच्या परीक्षा, जुलै महिन्यात सुरुवात

कोणत्या परीक्षा कशा पद्धतीने होणार -

पदवी आणि पदव्युत्तर अंतिम सत्राची परीक्षा विद्यापीठाच्यावतीने १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान घेतली जाणार आहे. जे विद्यार्थी पदवीच्या अंतिम सत्राची परीक्षा देणार आहेत, त्यांच्या बॅकलॉगची परीक्षा ८ जुलै ते १० जुलै दरम्यान संबंधित महाविद्यालयाच्या पातळीवर घेण्यात येणार आहे. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या अंतिम सत्राची परीक्षा देता येईल आणि पुढील वर्गात प्रवेश मिळेल.

दोन वर्षीय कोर्सच्या प्रथम वर्षाच्या, तीन वर्षीय पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या, चार वर्षीय पदवीच्या प्रथम द्वितीय तृतीय वर्षाच्या, पाच वर्षीय पदवीच्या प्रथम ते चौथ्या वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. या रद्द झालेल्या परीक्षेची गुणदान पद्धती विद्यापीठाने स्पष्ट केली आहे. त्यात अंतर्गत मूल्यमापनात पडलेल्या एकूण गुणाच्या ५० टक्के आणि पूर्वीच्या सत्राच्या प्राप्त गुणाच्या पन्नास टक्के गुण या दोन्हींची बेरीज करून सरासरी गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत, परंतु त्यांचे पूर्वीच्या सत्रातील पेपर बॅक आहेत, असे पेपर हिवाळी २०२० या परीक्षेबरोबर घेण्यात येणार आहेत.

Last Updated : May 21, 2020, 11:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.