नांदेड - जिल्ह्यातून दिलासादायक बातमी समोर येत आहे. सलग पाचव्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या वाढली आहे. आज प्राप्त झालेल्या 3 हजार 564 अहवालांपैकी 873 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 744 तर अँटिजेन तपासणीद्वारे 129 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्याती कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 76 हजार 55 वर पोहोचला असून, यातील 62 हजार 418 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात सध्या 12 हजार 795 सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी 249 कोरोनाबाधितांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात एकूण 24 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा हा 1 हजार 454 वर पोहोचला आहे.
उपलब्ध असलेल्या बेडची संख्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 21, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 8, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 25 बेड उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा थोडक्यात आढावा
एकूण घेतलेले स्वॅब- 4 लाख 46 हजार 832
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 60 हजार 958
एकूण पॉझिटिव्ह व्यक्ती- 76 हजार 928
एकूण कोरोनामुक्तांची संख्या 62 हजार 418
एकूण मृत्यू -1 हजार 454
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-19
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-28
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-378
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 12 हजार 795
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले व्यक्ती -249
हेही वाचा - ठाण्यातील वेदांता रुग्णालयात ऑक्सिजनअभावी चार कोविड रुग्णांचा मृत्यू? चौकशीचे आदेश