नांदेड - राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज मुदखेड तालुक्यातील चिकाळातांडा येथील दारू निर्मात्यांवर कारवाई केली आहे. कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान विभागाचे २ कर्मचारीदेखील जखमी झाले आहेत.
कारवाईमध्ये ५०० लिटर हातभट्टी दारूसह २० दुचाकी, १ कार असे एकूण ३५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाईदरम्यान आरोपींचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे २ कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात जाऊन याप्रकरणी माहिती घेतली आहे. तसेच, दोघांनीही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईचे कौतुक केले आहे.
हेही वाचा- कोरोना : उच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे अनुपालन करा, जिल्हा न्यायाधीशांचे आवाहन