नांदेड Maratha Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड-हैदराबाद रोडवर कृष्णर येथे आरक्षणासाठी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. नायगाव तालुक्याच्या हद्दीतील प्रत्येक गावात मराठा आरक्षणाच्या मागणीनं हिंसक स्वरूप धारण केलं आहे. त्यांच्या निषेधार्थ जरांगे पाटील यांच्या उपोषणाला बळ देण्यासाठी कालपासून ठिकठिकाणी टायर जाळून चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झालीय.
रुग्णवाहिकेची तोडफोड : या चक्काजाम आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकां बसत आहे. घुंगराळा येथे सकाळी सातच्या सुमारास रुग्णवाहिकेची तोडफोड करण्यात आली. नांदेडहून नायगावकडे येणारी पोलीस व्हॅनही संतप्त मराठा तरुणांनी परत पाठवली. देऊळगाव फाटा, पळसगाव फाटा, घुगनराळा, कुष्णूर, कहाळा, खैरगाव, बेटकाबिलोली फाटा, मुखेड रोडवरील होताळा, खांडगाव फाटा यासह अनेक ठिकाणी परिसरातील मराठा बांधवांनी मुख्य रस्त्यावर एकत्र येऊन आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केलं.
पोलीस बंदोबस्तात वाढ : नांदेड-हैदराबाद राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू असताना ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. आंदोलनाचं स्वरूप पाहून सर्वत्र पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
जिल्हादंडाधिकाऱ्याचे प्रतिबंधात्मक आदेश : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी उपोषण, धरणे, मोर्चे, रास्ता रोको, आंदोलनावर बंदी घातली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हा दंडाधिकारी अभिजित राऊत यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
हेही वाचा -