नांदेड - शहरात पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी आता विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर 'ड्रोन'ने नजर ठेवून कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. कोरोना विषाणू पसरू नये यासाठी संपूर्ण देशभर लॉकडाऊन सुरू आहे.
केंद्रासह राज्य सरकार अनेक कठोर पावले उचलत आहे. प्रशासनाकडून वारंवार नियमावली बजावली जात आहे. मात्र, वारंवार सूचना करूनही टवाळखोरांचे टोळके गरज नसतानाही रस्त्यावर येऊन फिरताना आढळून येत आहेत.
रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांवर जरब बसवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी टोळक्यांवर नजर ठेवण्यासाठी आता ड्रोनची मदत घेणार असल्याचे सांगितले आहे. ड्रोनच्या माध्यमातून टवाळखोरांवर कारवाई करणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
शहरात ज्या ठिकाणी बिनकांमाचे टोळके जमत असलेल्या ठिकाणावर या ड्रोनची नजर असणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून यांच्यावर आता कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिले आहेत.