ETV Bharat / state

Nanded Hospital Death Case : नवजात बाळासह आता आईनंही सोडला श्वास; नातेवाईकांचा आक्रोश - Newborn Girl And Mother Died

Nanded Hospital Death Case : नांदेड शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital) मृत्यूचे तांडव सुरूच असून, यात एका मातेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू झाला. 22 वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी (Maternal and Neonatal Death) दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. महिलेची नैसर्गिक प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. पण शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेची प्रकृती बिघडत गेली आणि बुधवारी महिलेचा मृत्यू झाला.

Newborn Girl And Mother Died
नातेवाईकांचा आक्रोश
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 10:05 PM IST

Updated : Oct 4, 2023, 10:28 PM IST

महिलेच्या आणि बाळाच्या मृत्यूविषयी दु:ख व्यक्त करताना नातेवाईक

नांदेड : Nanded Hospital Death Case : शनिवारपासून महिलेवर उपचार सुरू असताना, डॉक्टरांनी उपचाराबाबत काही माहिती दिली नाही. सर्व औषधी आणि रक्त तपासण्या बाहेरून कराव्या लागल्या. त्यासाठी 40 ते 45 हजारांचा खर्च करावा लागल्याची माहिती महिलेच्या पतीने दिली. त्यात बुधवारी महिलेचा मृत्यू झाला. बाळ आणि नंतर आईचाही मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी हंबरडा फोडला.

पत्नी आणि मुलगी दगावल्यानं पतीचा हंबरडा : शासकीय रुग्णालयात औषधी उपलब्ध नसल्यामुळे बाहेरून औषधी आणावी लागली. याचा खर्च चाळीस हजाराहून अधिक आला आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या परिवारास हा खर्च न परवडणारा आहे. त्यातच बाळ आणि पत्नीला गमावल्याने पतीनेही हंबरडा फोडत प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या सर्व घटनेस रुग्णालय व्यवस्थापन जबाबदार असल्याची प्रतिक्रिया परिवारातील सदस्यांनी दिली.

आधी सांगितले, बाळ आणि आई दोघेही सुरक्षित : शनिवारी रात्री एक ते दीडच्या दरम्यान सामान्य प्रसूती झाली. यानंतर डॉक्टरांनी बाळ व बाळाची आई दोघेही सुखरूप असल्याची माहिती दिली. पण, सोमवारी तुमच्या बाळाचा मृत्यू झाला असं म्हणत बाळाला घेऊन जा असे सांगितले. बाळाला व बाळाच्या आईला लागणारी औषधी डॉक्टर लिहून देत होते. ते आम्ही बाहेरून आणत होतो. औषधाचा खर्च पन्नास हजाराच्या जवळपास लागला. पण, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पत्नी व मुलगी गेल्याने अत्यंत दु:खी झाल्याची प्रतिक्रिया महिलेचा पती मंचक वाघमारे यांनी माहिती दिली.

कुटुंबाने वडेट्टीवारांसमोरच टाहो फोडला : शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कॉंग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली. यावेळी एका कुटुंबाने आपली मुलगी आणि तिचे नवजात बाळ गमावले. त्या कुटुंबाने वडेट्टीवारांसमोरच टाहो फोडला. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. खूप चीड येत आहे. सत्तेत बसलेल्या निष्ठुर सत्ताधाऱ्यांची थोडी तरी माणुसकी शिल्लक असेल तर सत्तेची मलाई खाणाऱ्यांनी डोळे उघडावे, अशी जोरदार टीका विजय वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. यापूर्वीही अनेक शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा आणि मातेचा मृत्यू झाल्याची प्रकरणे समोर आली आहे. यावर सत्ताधाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्याची ग्वाही दिली. पण, मृत्यूचे दृष्टचक्र थांबत नसल्याने प्रशासनासह शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

हेही वाचा:

  1. Silicone Lucy : आयआयटी दिल्लीनं सिलिकॉनपासून बनविली हुबेहूब नवजात बालकाची प्रतिकृती, जाणून घ्या कारण
  2. Nandurbar Child Death: नंदुरबार जिल्हा रुग्णालयात 179 बालमृत्यू, रिक्त पदांमुळे बालकांचा व गरोदर मातांचा मृत्यू - आमदार आमश्या पाडवी
  3. Muzaffarpur Boat Capsizing : नदीत बोट उलटून 12 चिमुकल्यांचा मृत्यू; दुर्घटनेचा व्हिडिओ आला समोर

Last Updated : Oct 4, 2023, 10:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.