ETV Bharat / state

Nanded Hospital Death : अस्वच्छता पाहून मला लाज वाटते, रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई - मंत्री हसन मुश्रीफ

Nanded Hospital Death : नांदेडच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यामुळं राज्यात अराजकता निर्माण झाली आहे. या घटनेची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. समितीचा अहवाल येताच रुग्णाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

Nanded Hospital Death
Nanded Hospital Death
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 10:56 PM IST

हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

नांदेड : Nanded Hospital Death : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात 48 तासांत 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात खळबळ माजवणाऱ्या या गंभीर घटनेनंतर राज्याचे आरोग्य शिक्षणमंत्री तसंच नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दुपारी शासकीय रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली. यानंतर शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते. यावेळी खा. प्रतापा पाटील चिखलीकर, श्री.राम पाटील रातोळीकर, डॉ.राजेश पवार, आरोग्य संचालक डॉ. दिलीप म्हैसाईकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते.

आरोग्य सेवेवर ताण : पुढे बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अनेक त्रुटी आहेत. अपुरे मनुष्यबळ आहे. रुग्णालयातील अस्वच्छता लज्जास्पद आहे. शासकीय रुग्णालयात 500 खाटा आहेत. मात्र येथे 1 हजाराहून अधिक रुग्ण येतात. वर्ग 1 ते वर्ग 4 पर्यंत काही पदे रिक्त आहेत. यामुळं आरोग्य सेवेवर ताण वाढत आहे. या घटनेला सरकार म्हणून आम्ही जबाबदार आहोत. यापुढं मृत्यू होणार नाहीत. यासाठी आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत.

चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती : 30 मृत्यूंची वैयक्तिक चौकशी केली जाईल. चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. समितीचा अहवाल येताच दोषींवर कारवाई केली जाईल. येत्या काही दिवसांत आवश्यक औषध, मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं जाईल. पूर्णवेळ डीनची नियुक्ती करून रिक्त पदे भरण्यात येतील. सरकारी रुग्णालयाला भेटीत हसन मुश्रीफ यांनी या घटनेची सविस्तर माहिती घेतली. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, श्री.प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते.

रुग्णांचा मृत्यू नेमका कसा झाला? : नांदेड जिल्ह्यात काल 2 ऑक्टोबर रोजी 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यूनं आरोग्य व्यवस्थेचे ढिंढोरे निघाले आहेत. या घटनेत 12 नवजात बालकांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलंय. आज आणखी 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा 31 वर पोहोचला आहे. दोन दिवसात इतक्या रुग्णांचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. यासोबतच चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल. या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. Nanded Hospital Death Case : घटना दुर्दैवी, पण यंत्रणेचा दोष नाही; मुख्यमंत्र्यांचा दावा
  2. Aaditya Thackeray : 'शासकीय रुग्णालय' मृत्यूचा सापळा बनलाय का? आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
  3. Nanded Patient Death Case : रुग्णालयात मृत्यूचं तांडव, सत्ताधारी खासदारानं रुग्णालयाच्या डीनला साफ करायला लावलं शौचालय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.