नांदेड - कर्ज व नापिकीला कंटाळून अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. आनंदा बालाजी कल्याणकर (वय-४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
आनंदा बालाजी कल्याणकर यांच्या नावावर ३ एकर २० गुंठे जमीन आहे. त्यांच्यावर सेवा सहकारी सोसायटी व बँकेचे कर्ज होते. १२ नोव्हेंबरला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास शेतातील नापिकीला कंटाळून कल्याणकर यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगी, दोन मुले, एक मुलगी असा मोठा परिवार आहे.